पक्ष्यांसाठी राखून ठेवले अर्धा एकर क्षेत्रातील ज्वारीचे पीक – eNavakal
महाराष्ट्र

पक्ष्यांसाठी राखून ठेवले अर्धा एकर क्षेत्रातील ज्वारीचे पीक

पिंपरी – आपण घरात प्राणी, पक्षी पाळून त्यांना पाणी, चारा देऊन त्यांचे संगोपन करणारे अनेक जण पाहतो. पण सद्यस्थितीत वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या निवाऱ्याबरोबरच त्यांना खाद्य मिळणेही अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर खराबवाडीतील प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर शिवराम कड या शेतकऱ्याने अर्धा एकर क्षेत्रातील ज्वारीचे पीक चक्क पक्ष्यांना खाण्यासाठी राखून ठेवले आहे. ज्वारीच्या उत्पन्नाचा त्याग करून त्यांनी दाखविलेल्या पक्षिमायेचे पक्षिप्रेमींतून कौतुक होत आहे.

ज्ञानेश्वर कड यांची खराबवाडी (चाकण) परिसरात चार एकर शेती आहे. यातील अर्धा एकर क्षेत्रात त्यांनी ज्वारीचे पीक घेतले आहे. या सर्व क्षेत्रांतील ज्वारीचे उभे पीक कड यांनी पक्ष्यांसाठी राखून ठेवले आहे. सध्या त्यांच्या ज्वारीच्या पिकात अनेक प्रकारचे पक्षी सकाळ-संध्याकाळ येत असतात. काही पक्ष्यांनी तर या ठिकाणी असलेल्या मोठ्या झाडांवर आपली घरटी केली आहेत. कड यांनी शेजारीच असलेल्या नारळाच्या झाडांना मडकी बांधली आहेत. जेणेकरून पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे. चारा, पाणी मुबलक मिळत असल्याने पक्ष्यांचे थवेच्या थवे या ठिकाणी पाहायला मिळतात.
ज्वारीच्या या क्षेत्रातून कड यांना 15 ते 17 क्विंटल ज्वारीचे उत्पादन मिळाले असते. मात्र, उत्पन्नाचा विचार न करता त्यांनी ज्वारीचे उभे पीक पक्ष्यांसाठी उपलब्ध करून पक्ष्यांविषयी आपुलकीचे नाते निर्माण केले आहे. त्यांच्या या पक्षीप्रेमाचे चाकण परिसरात कौतुक होत आहे.

प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर कड म्हणाले, ‘आज राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे ज्वारीचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे उन्हात पक्ष्यांना चारा पाण्याच्या शोधात भटकावे लागत आहे. तसेच वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या राहण्याबरोबरच त्यांच्या खाण्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतातील ज्वारीचे पीक पक्ष्यांना दान करण्याचा निर्णय घेतला. ज्वारीच्या उत्पादनाचा त्याग करून ते पक्ष्यांसाठी राखून ठेवत आहे.’

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अमित शहा २२ तारखेला मुंबईत; युतीवर शिक्कामोर्तब होणार?

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा २२ सप्टेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत.यावेळी गोरेगावच्या नेस्को मैदानात त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

शाळा-महाविद्यालयांना सुट्टी पण अतिवृष्टी नाहीच

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार...
Read More
post-image
देश न्यायालय

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केेंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज दिल्लीतील न्यायालयाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र

टोमॅटोच्या भावात मोठी घसरण; २० किलोच्या कॅरेटला १०० रुपये

मनमाड – खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे नगदी पीक म्हणून असणारे टोमॅटो पीक शेतकर्‍याची चिंता वाढवू लागली आहे. टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. घाऊक...
Read More