पंधराव्या वित्त आयोगामधून राज्याला १ हजार ४५६ कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त – eNavakal
महाराष्ट्र

पंधराव्या वित्त आयोगामधून राज्याला १ हजार ४५६ कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त

मुंबई – पंधराव्या वित्त आयोगामधून सन २०२०-२१ या कालावधीसाठी केंद्र शासनाकडून राज्याला एकूण ५ हजार ८२७ कोटी रुपये इतका निधी मंजूर आहे. या निधीपैकी १ हजार ४५६ कोटी ७५ लाख रुपये इतका निधी पहिला हप्ता बेसिक ग्रँट (अनटाईड) म्हणून प्राप्त झाला आहे. या निधीचे वितरण ८० टक्के ग्रामपंचायत, १० टक्के पंचायत समिती आणि १० टक्के जिल्हा परिषद या प्रमाणात तिन्ही स्तरावर करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

चौदाव्या वित्त आयोगाचा कालावधीमागील वर्षी समाप्त झाला. आता चालू आर्थिक वर्षापासून पुढील ५ वर्षाच्या कालावधीसाठी पंधराव्या वित्त आयोगामधून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकास कामांसाठी निधी मिळणार आहे. या निधीपैकी ८० टक्के निधी हा थेट गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना वितरित केला जातो. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना प्रत्येकी १० टक्के निधी दिला जातो. गावांना मोठा निधी मिळत असल्याने यामुळे गावांमधील विविध पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळते, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. पंधराव्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीमधून राज्यातील सर्व गावांमध्ये चांगल्या प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी केंद्र शासनाकडून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्याला बेसिक ग्रँट (अनटाईड) व टाईड ग्रँट (Tied Grant) अशा दोन प्रकारच्या ग्रॅन्टच्या स्वरूपात ५० – ५० टक्के या प्रमाणात निधी प्राप्त होणार आहे. पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार बेसिक ग्रँट (अनटाईड) ही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर्मचारी पगार किंवा आस्थापना विषयक बाबी वगळून इतर स्थानिक गरजेनुसार (Location Specific felt needs ) आवश्यक बाबींवर वापरावयाची आहे, अशी माहिती मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपये प्राप्त

मुंबई – राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातील 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत निधी काल प्राप्त झाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कुपोषणमुक्तीसाठी सकस आहार पुरवठ्याला गती देणार – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती – कोरोना संकटकाळात निर्माण झालेल्या विविध अडचणींचा सामना करत शासन- प्रशासनाने विविध सुविधा व योजनांना चालना दिली. प्रभावी उपचारयंत्रणेसाठी प्रयोगशाळा, प्लाझ्मा सुविधा, कोविड...
Read More
post-image
देश

चीनचा डोळा आता हिंद महासागरावर,पाकिस्तानच्या बंदरात खलबतं सुरू

मुंबई -चीन भारतविरोधी सतत कारवाया करत असून आता चीनचा हिंद महासागरावरही डोळा आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची नाकाबंदी सुरु झाल्यामुळे चीननं ही नवी चाल...
Read More
post-image
Uncategoriz देश शिक्षण

स्कूल फ्रॉम होममुळे ७२.८% विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रक्रियेवर परिणाम, सर्वेक्षण

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात स्कूल फ्रॉम होम सुरू झाले आहे. मात्र या नव्या पद्धतीचं शिक्षण घेताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना कसरत करावी लागत...
Read More
post-image
देश

‘या’ आयटी कंपनीत ५०० कर्मचारी कपात, भारतीय परदेशातून परतणार

नवी दिल्ली -भारतातील अनेक तंत्रकुशल नागरिक इंग्लड, अमेरिकेसारख्या देशात नोकरीसाठी वात्सव्यास आहेत. मात्र कोरोनाच्या काळात त्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. कारण, का आघाडीच्या आयटी...
Read More