पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले, मोदी-मोदी आणि वंदे मातरमचे जोरदार नारे लगावण्यात आले. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच राजकीय दौरा आहे. तसेच मोदी आज यजमान पंतप्रधान शिंजो आबे यांची भेट घेणार असून उद्या अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान व्यापार संबंधांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदींचे ओसाका विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. जी-२० परिषदेसाठी रवाना होण्यापूर्वी मोदींनी महिला सशक्तिकरण, डिजिटलाइजेशन आणि जलवायु परिवर्तन अशा मुद्द्यांना परिषदेत अधिक महत्त्व असल्याचे सांगितले.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी यांच्यातील चर्चा परिषदेचे मुख्य आकर्षण असेलच मात्र शी, मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांची त्रिपक्षीय बैठककडेही सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More