पंतप्रधानपदाच्या आशा पल्लवित; शरद पवार माढामधून लढणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

पंतप्रधानपदाच्या आशा पल्लवित; शरद पवार माढामधून लढणार

पुणे – आगामी 17 व्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर देशात कुठच्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण होणार आहे. अशावेळी 10-12 खासदार असलेल्या छोट्या पक्षाचा नेताही पंतप्रधान होऊ शकतो. त्यामुळेच महाराष्ट्राचा जाणता राजा शरद पवार यांना आता पुढील पंतप्रधान होण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आशा पालवलेल्या शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. आज त्यांनी याबाबत स्पष्ट सुतोवाच केले.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवार प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह खुद्द राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनीच धरला आहे. मात्र मी अजून विचार केलेला नाही. परंतु सर्व नेत्यांनीच माझ्यावर दबाव आणला आहे की, आम्ही तुमचे सर्व निर्णय मुकाट्याने ऐकतो व त्याची अंमलबजावणी करतो. त्यामुळे आता तुम्हाला आमचा आग्रह मानावाच लागेल. यावरून शरद पवार यांनी माढा लोकसभेची निवडणूक लढविण्याचे मन बनविले आहे, हेच दिसून येते. शरद पवार ज्यावेळी नाही म्हणतात त्यावेळी त्याचा अर्थ ‘हो’ असतो आणि ज्यावेळी ‘हो’ म्हणतात त्याचा अर्थ ‘नाही’ असा असतो, असा महाराष्ट्रातील जनतेचा अनुभव आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More
post-image
देश

पश्चिम बंगालचे डॉक्टर ममता बॅनर्जींसोबत सशर्त चर्चेस तयार

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मागणीनंतर संपावर असलेले शिकाऊ डॉक्टर चर्चेसाठी तयार झाले आहेत. मात्र ‘आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला तयार आहोत...
Read More