पंढरपूर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; ६ ठार १ जखमी – eNavakal
अपघात आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंढरपूर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; ६ ठार १ जखमी

सोलापूर – सोलापूर – पंढरपूर रस्त्यावर ईश्वर वठार परिसरातील घाडगे वस्तीजवळ कार एसटीवर आदळून झालेल्या भीषण अपघातात कारमधील सहाजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली.  सुरेश रामचंद्र कोकणे ( ६८ ) , सचिन सुरेश कोकणे ( ४०),  सविता सचिन कोकणे ( ३४ ) ,  आर्यन सचिन कोकणे ( १२ ) ,  श्रद्धा राजेश सावंत ( २० ) ,  प्रथम राजेश सावंत ( १६ ) अशी मृतांची नावे आहेत.  धनश्री राजेश सावंत ( १९ ) हि गंबीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. अपघात इतका भीषण होताकी कारच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला होता.
मुंबई येथील घाटकोपर परिसरात राहणाऱ्या सुरेश कोकणे हे आपल्या कुटुंबासह पंढरपूर येथे दर्शनाला येत असताना त्यांच्या (एमएच ०३ ए झेड -३११६) या मारुती इको कारने  राज्य परिवहन महामंडळाच्या इस्लामपूर आगाराच्या  (एम- एच- ०७ –  सी- ९०१७) या इस्लामपूर- अक्कलकोट या सोलापूरकडे निघालेल्या एसटी बसला दिलेल्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला असून एक मुलगी गंभीर जखमी आहे . सुरेश कोकणे कुटुंब  अक्कलकोट  येथील देवदर्शन आटोपून य पंढरपूरकडे दर्शनाला येत असताना दुपारी साडेचारच्या दरम्यान पंढरपूर जवळील ईश्वरवठार परिसरात हा भीषण अपघात झाला . पंढरपूरकडून अक्कलकोटला निघालेल्या बसला कोकणे यांच्या कारने समोरून धडक दिल्याने त्यांची गाडी थेट बसमध्ये घुसून बसली होती. जोरदार आवाजाने जवळपासच्या ग्रामस्थांनी तातडीने मदत करीत पहिल्यांदा गाडीतील जखमींना बाहेर काढायचा प्रयत्न केला मात्र जागीच पाच जणांचा मृत्यू झाल्याचे दिसून आल्यावर यातील जखमी तरुण आणि तरुणीला तातडीने उपचारासाठी पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरु असताना यातील तरुणाचाही मृत्यू झाल्याने गंभीर अवस्थेतील जखमी तरुणीला उपचारासाठी सोलापुरात हलविण्यात आले आहे . या अपघातातील सुरेश कोकणे यांचे मुंबई येथे लक्ष्मी केटरर्स हि फर्म आहे. या अपघातात कारमधील सातपैकी सहाजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्यामुळे बराच वेळ मृतांची ओळख पटत नव्हती. अखेर उशिरा संपर्क साधून मृतांची ओळख पटविण्यात आली .

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

दहीहंडी निमित्त आज शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई- दहीहंडी उत्सव असल्याने उद्या शनिवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून उद्या...
Read More
post-image
News देश

राहुल गांधी आज काश्मिरला जाणार

नवी दिल्ली- कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांसोबत आज  काश्मिरच्या दौर्‍यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा...
Read More
post-image
News मुंबई

विमानतळ धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश करणार्‍या तरुणाला अटक

मुंबई – विमानतळाच्या धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी एका 24 वर्षांच्या तरुणाला काल विमानतळ पोलिसांनी अटक केली. कामरान अब्दुल हलीम शेख असे या आरोपी तरुणाचे...
Read More
post-image
News मुंबई

मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवार 25 ऑगस्टला मेगाब्लॉक

मुंबई- मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 25 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.20...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई – राज्यात आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना आता ‘आम आदमी पक्षाने’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘आप’चे राष्ट्रीय...
Read More