पंड्याने दिले आक्षेपार्ह ट्वीटबाबत स्पष्टीकरण – eNavakal
क्रीडा देश

पंड्याने दिले आक्षेपार्ह ट्वीटबाबत स्पष्टीकरण

नवी दिल्ली – क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी आक्षेपार्ह ट्वीट केले अशी बातमी माध्यमांद्वारे सर्वत्र पसरली. परंतु, ट्वीटवरून आक्षेपार्ह ट्वीट आपण केले नसून कोणीतरी बनावट ट्वीटर अकाऊंट बनवून ते आक्षेपार्ह विधान केले आहे, असे स्पष्टीकरण हार्दिक पंड्या याने त्याच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन दिले आहे.

हार्दिक पंड्याने २६ डिसेंबर २०१७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी आक्षेपार्ह ट्वीट केले अशी बातमी पसरल्यामुळे डी. आर. मेघवाल यांनी कोर्टात याचिका दाखल करून हार्दिक पंड्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिवाय दलित समाजाच्या भावना भडकावल्या असा आरोपही मेघवाल यांनी पंड्यावर केला आहे. याविषयी पंड्याने  त्याच्या अधिकृत ट्वीट अकाऊंटवरुन स्पष्टीकरण दिले आहे. त्यात त्याने लिहिलंय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय समाज व भारतीय संविधानाविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. कोणीतरी माझ्या नावाचे बनावट अकाऊंट बनवून आक्षेपार्ह विधान केले आहे. याविषयी आवश्यक पुरावे मी कोर्टात उपलब्ध करून देईन. या प्रकरणाविषयी अदयाप काहीही अधिकृतपणे स्पष्ट झालेले नसल्यामुले कोर्टाने हार्दिक पान्द्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेलं आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद – केंद्राची सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्क्रमातून ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली होती. महात्मा गांधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More