पंजाब विरुद्ध मुंबईने घेतला मागील पराभवाचा बदला – eNavakal
क्रीडा मुंबई

पंजाब विरुद्ध मुंबईने घेतला मागील पराभवाचा बदला

मुंबई-वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील आजच्या महत्वपूर्ण लढतीत गतविजेत्या मुंबईने पंजाबचा थरारक लढतीत अवघ्या 3 धावांनी पराभव करून मागील पराभवाचा बदला घेतला. तसेच स्पर्धेतील ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश करण्याच्या आपल्या आशा कायम राखल्या आहेत. विजयासाठी पंजाबला 187 धावांची गरज होती. पण त्यांना 20 षटकात 5 बाद 183 धावांचीच मजल मारता आली. सलामीवीर राहूलची झुंजार 94 धावांची  खेळी व्यर्थ ठरली. तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. बुमराहाने सुरेख मारा करून तीन महत्त्वाचे बळी घेऊन मुंबईला शानदार विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 13 सामन्यात मुंबईचा हा 6 वा विजय होता. तर 13 सामन्यात पंजाबचा हा 7 वा पराभव होता. आता रविवारी मुंबईचा शेवटचा सामना दिल्ली विरुध्द होणार आहे. तो मुंबईने  मोठ्या फरकाने जिंकल्यास मुंबईला ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश करण्याची संधी मिळेल. मुंबईने गुणतालिकेत आता चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार अश्विनने मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. ‘कमबॅक’ करणार्‍या अष्टपैलू पोलार्डने काढलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने 20 षटकांत 8 बाद 186 धावांची मजल मारली. मुंबईची सुरुवात खराब झाली. पहिले 4 फलंदाज अवघ्या 71 धावांतच 8.2 षटकांत तंबुत परतले. सलामीवीर लुईसला टायने अवघ्या 9 धावांवर बाद करून पंजाबला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर आलेल्या किशानला देखील टायनेच 20 धावांवर माघारी पाठविले. तर नंतर जम बसलेल्या सूर्यकुमार यादवलादेखील 27 धावांवर बाद करून पंजाबला तिसरे यश मिळवून दिले. त्याने 15 चेंडू खेळताना 3 चौकार आणि 2 षटकार मारले. कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला 6 धावांवर राजपूतने बाद करून मुंबईला मोठा धक्का दिला. कृणाल पंड्या आंणि पोलार्डने पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अखेर पंड्याला स्टोनिसने 32 धावांवर बाद करून ही जोडी फोडली. त्याने 23 चेंडू खेळताना 1 चौकार आणि 2 षटकार मारले. पांड्या पाठोपाठ मग पोलार्डदेखील तंबुत परतला. अश्विनने त्याला 50 धावांवर बाद केले. त्याने अवघ्या 23 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकार मारून झटपट अर्धशतकी खेळी केली.तो बाद झाल्यानंतर मात्र इतर फलंदाज मोठी धावसंख्या काढण्यात अपयशी ठरले. त्यामुळे मुंबईला 200 धावांचा टप्पा गाठता आला नाही. पंजाबतर्फे टायने सुरेख मारा करताना अवघ्या 16 धावांत 4 गडी टिपले. तर कर्णधार अश्विनने देखील 18 धावा देऊन दोन बळी घेतले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
Uncategoriz

अजयने शेअर केला पत्नी काजोलचा मोबाईल नंबर

मुंबई – आपल्या आवडत्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा पर्सनल मोबाईल नंबर मिळावा आणि त्यांच्याशी एकदा तरी फोनवर प्रत्यक्षात बोलता याव अशी इच्छा प्रत्येक चाहत्याची असते....
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – गणेशमंडळांनाच समुपदेशनाची गरज

गणेशविसर्जनाच्या काळात सर्व प्रकारची काळजी घेऊनही अनेकांचे बळी जाण्याचा प्रकार धक्कादायक ठरतो. याबद्दलचा निश्चित आकडा उपलब्ध झाला नसला तरी दोन लहान मुले आणि नाशिकच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

राज्यभरात विसर्जनादरम्यान 20 जणांचा बुडून मृत्यू

मुंबई –  ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी करीत मुंबईसह राज्यभरातील गणपती बाप्पाला निरोप...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उत्तर भारतात पावसाचे थैमान, ८ जणांचा मृत्यू

चंडीगड – केरळमध्ये पावसाने हैदोस घातल्यानंतर आता उत्तर भारतात पावसाने हाहाकार माजवला आहे. हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे ८ जणांना जीवाला मुकावे लागले आहेत. तर, पंजाब, हरयाणा...
Read More