पंजाबमधील सर्पमित्राच्या मृत्यू प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

पंजाबमधील सर्पमित्राच्या मृत्यू प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल

नाशिक – पंजाब येथील सर्पमित्र विक्रमसिंग मलोतच्या मृत्यूप्रकरणी आज पोलिसांनी आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये मयत विक्रमसिंगसह त्याच्या भाऊ तसेच एका तरूणीचाही समावेश आहे. विषारी सर्प अवैद्यरित्या घरात बाळगणे, स्टंटबाजी करणाऱ्या विक्रमसिंगला उत्तेजन देणे या कलमान्वये पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कारवाई केली आहे. या घटनेमुळे शहरातील सर्पमित्रांध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी चौघांना गजाआड केले आहे.

मागील आठवडयात भाऊ आणि मित्रासह नाशिकला आलेले सर्पमित्र विक्रमसिंग मलोत बाळू बोराडे यांच्या घरी गेले होते. यावेळी बोराडे यांच्या घरी इतरही काही सर्पमित्र उपस्थित होते. विक्रमसिंगने बोराडे यांनी घरात बाळगलेले अती विषारी साप बाहेर काढत स्टंटबाजी केली. या दरम्यान एका सापाने विक्रमसिंगला दंश केला. यात विक्रमसिंगचा मृत्यू झाला होता. विक्रमसिंगच्या स्टंटबाजीला उत्तेजन देणे, घरात अती विषारी सर्प बाळगणे तसेच वनजीव कायद्याने उल्लघंन केल्याप्रकरणी पोलिसांनी आज नऊ जंणावर गुन्हा दाखल केला आहे. यात मयत विक्रमसिंग, त्याचा भाऊ जयविंदरसिग, मित्र साहिल माथूर तसेच नाशिक येथील झानेश्वर सोनार, मयुरी वानखेडे, योगेश पवार, बाळू बोराडे, दत्तात्रय गाडेकर यांचा समावेश आहे. या प्रकरणाची पालेमुळे खणून काढण्याचे काम शहर पोलीस करत आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दहशतवाद्यांच्या गडामध्ये भाजपाचा मोठा विजय

श्रीनगर – दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा गड मानल्या जाणार्‍या शोपिया, कुलगाम, पुलवामा आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये भाजपाने नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळविला आहे. 20 पैकी 4...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणी टंचाईवरून सत्ताधारी नगरसेवकांचा महापालिकेवर मोर्चा

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सत्ताधारी भाजप विरोधात विरोधक आक्रमक झाले असताना स्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेवर पाण्याच्या निषेधार्थ मोर्चा काढत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय

कर्नल पुरोहितांची ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल पुरोहित यांनी दाखल केलेली याचिका आज विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात यूएपीए कायद्याअंतर्गत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

साईच्या चरणी विक्रमी दान

शिर्डी – शिर्डीत साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाच्या 4 दिवसांमध्ये भाविकांनी तब्बल 5 कोटी 96 लाखांचे विक्रमी दान अर्पण केले आहे. या सोहळ्याला तीन लाख...
Read More