पंचगंगा नदीचे पात्र स्वच्छतेसाठी 47 कोटींचा प्रस्ताव मंजूर – eNavakal
News महाराष्ट्र

पंचगंगा नदीचे पात्र स्वच्छतेसाठी 47 कोटींचा प्रस्ताव मंजूर

कोल्हापूर – जिल्ह्यातून वाहणार्‍या पंचगंगेचे पात्र अतिशय प्रदूषित झाले आहे. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सहा गावांत नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी नाला खोलीकरण, नाल्यावर साखळी वनराई बंधार्‍याची निर्मिती प्रस्तावित आहे. त्याचबरोबर नदी स्वच्छतेसाठी जाणीव जागृती व उपक्रमांत नागरिकांना सामावून घेत आज प्रयाग चिखली येथे ’महास्वच्छता अभियान’आयोजित केले होते. जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून गांधीनगर, वडणगे, शिंगणापूर, पुलाची शिरोली, हालोंडी, नांदणी येथे सांडपाणी रोखण्याच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. 36 गावांतून नदीत मिसळणार्‍या 17 एमएलडी सांडपाणीपैकी 13.25 एमएलडी सांडपाणी रोखण्यात जि.प.ला यश आले आहे. नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत गांधीनगर येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रस्तावित आहे. 83 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. येत्या डिसेंबरपर्यंत स्वच्छताविषयक उपक्रमांचा आराखडा तयार केला असून, त्याद्वारे जिल्ह्याचे वेगळे रूप समोर येईल.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या 191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More