न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतोय -खडसे – eNavakal
News महाराष्ट्र

न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतोय -खडसे

नगर- माझ काय चुकलं, हे अगोदर सांगा, न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगतोय, असे वक्तव्य माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी करून लोकांच्या मनामध्ये अनेक संभ्रम निर्माण केले गेले. उद्या जर असे होत गेले तर नेते कोण राहणार? आरक्षणाच्या मुद्यावर तुम्हाला कोणाला किती आरक्षण द्यायच हे तुम्ही निर्णय घ्या, पण आमच्या ताटातला घास कोणी हिसकावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तो कदापी होऊ देणार नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये, असा इशारा खडसे यांनी यावेळी देऊन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, कोणाचेही आरक्षण हिरावून घेऊ नका, असा इशाराही त्यांनी दिला.

नगर येथे ओबीसी फाऊंडेशन इंडिया संस्थेच्यावतीने ओबीसी समाजातील एमपीएसी, युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या समाज बांधवांचा समाजभूषण पुरस्कार कार्यक्रम आयोजित केला होता, यावेळी ते बोलत हेाते. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार प्रकाश शेडगे, गोविंद घोळवे, हभप अदिनाथ महाराज शास्त्री, नाथा घुले, स्वाती मोराळे, पुष्पा पानसरे, संभाजी पाटील, राजेंद्र डोईफोडे, रत्नाकार मोढवे आदी उपस्थित होते. एकनाथ खडसे म्हणाले की, मी बोलतच राहणार, माझे काय चुकले हे अगोदर सांगा, न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगतोय असे खडसे यांनी सांगून लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, प्रश्न सोडविणारा नसला तर नेता कोण राहणार, शांत बसलो तर घातक आहे. मंत्रीपदापेक्षा मला समाज मोठा आहे. असे खडसे म्हणाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलांच्या आरोग्याची विचारपूस करून डोस द्या! आरोग्य सेविकांना सूचना

मुंबई – पालिकेमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना विविध औषधांचे डोस दिले जातात. या औषधांची अ‍ॅलर्जी मुलांना होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी औषधांचा डोस पाजणार्‍या...
Read More
post-image
News मुंबई

दादर येथे पाच एकर जमीन विक्रीची बतावणी करुन फसवणूक

मुंबई – रायगड येथील कर्जतमध्ये पाच एकर जमिन विक्रीची बतावणी करुन एका व्यक्तीकडून घेतलेल्या साडेसात लाख रुपयांची फसवणुकीप्रकरणी भामट्याविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे....
Read More
post-image
News मुंबई

सांताक्रुझमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर! पालिकेची डोळेझाक

मुंबई – राज्य सरकारने 23 जूनपासून प्लास्टीक पिशव्यांच्या वापरांवर बंदी लागू केल्यानंतरही सांताक्रुझ (पुर्व) भागातील फेरीवाले व काही दुकानदार प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर करताना...
Read More
post-image
News मुंबई

दहा दिवसांच्या मुलाला रिक्षात टाकून पलायन

मुंबई- कौटुंबिक वादातून दहा दिवसांच्या आपल्याच मुलाला रिक्षात टाकून पळून गेलेल्या माता-पित्याला काल वर्सोवा पोलिसांनी अटक केली. दुर्गा महेंद्र कामत आणि अंजूदेवी दुर्गा कामत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार! अशोक चव्हाण

सोलापूर- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच याचे राजकारण करणार नाही परंतु...
Read More