न्या. एम. जे. मिर्झा कोर्टासमोर संतोष पोळची सुनावणी चालणार – eNavakal
गुन्हे न्यायालय महाराष्ट्र

न्या. एम. जे. मिर्झा कोर्टासमोर संतोष पोळची सुनावणी चालणार

सातारा – वाई हत्याकांड प्रकरणाची सातारा जिल्हा न्यायालयातील सुनावणी आता जिल्हा न्यायाधीश – 1 एम. जे. मिर्झा यांच्यासमोर होणार आहे. 29 डिसेंबर रोजी पुढील नियमित सुनावणी सुरू होईल. याअगोदरचे न्या. डी. डब्ल्यू. देशपांडे हे निवृत्त झाल्याने हा खटला कोणत्या न्यायाधीशांकडे चालणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
राज्यासह देशात खळबळ उडवून देणार्‍या सातारच्या वाई येथील कथित डॉक्टर संतोष पोळ याने 2003 ते 2016 या 13 वर्षात एकामागून एक असे सहा खून करून ते मृतदेह पुरल्याची कबुली दिल्याची घटना आहे. अंगणवाडी सेविका मंगल जेधे, सुरेखा चिकणे, वनिता गायकवाड, जगाबाई पोळ, नथमल भंडारी, सलमा शेख यांचा खून केला. असल्याची कबुली पोळ याने दिली आहे.
वाई हत्याकांडप्रकरणी सातारा पोलिसांनी डॉ. पोळची साथीदार ज्योती मांढरे हिला अटक केली आहे.दोघेही संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत असून डॉ. पोळ याला कळंबा जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. वाई हत्याकांडाच्या घटनेची व्याप्ती व दुर्मिळ घटना पाहून शासनाकडून या खटल्याच्या कामकाजासाठी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. सातारा जिल्हा न्यायालयात सुमारे 8 महिन्यांपूर्वी सुनावणीला सुरुवात झाली असून सुरुवातीला हा खटला न्या. डी. डब्ल्यू. देशपांडे यांच्यासमोर सुरु होता.
आतापर्यंत या खटल्यात ज्योती मांढरे हिला माफीचा साक्षीदार करण्यात आले आहे. याशिवाय सरकार पक्षातर्फे सहा खुनांचा खटला एकत्र चालवावा, अशी मागणी होती तर सर्व खून वेगवेगळे असून खटलाही वेगवेगळा चालवावा, अशी मागणी बचाव पक्षाची होती. सरकार पक्षाची मागणी न्या. देशपांडे फेटाळली आहे. दरम्यान सर्व खटला एकत्र चालवावा या मागणीसाठी सरकार पक्ष उच्च न्यायालयात गेले आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

बिहारमधील ‘या’ रस्त्याला सुशांत सिंह राजपुतचे नाव

पाटणा – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या (Sushant Sing Rajput Suicide Case) निधनाचा देशभरातील चाहत्यांना धक्का बसला आहे. लोक आपआपल्यापरिने त्याला श्रद्धांजली देत आहेत. नुकतेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

घरगुती गणेशोत्सवावरही मर्यादा! राज्य सरकारने जारी केली मार्गदर्शक सूचना

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याच आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार अनेक गणेशमंडळांनी गणेशमूर्ती न बसवता आरोग्य उत्सव साजरा करण्याचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दिल्लीतील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा रद्द, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीयांची घोषणा

नवी दिल्ली – कोरोनाची (corona pandemic) परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील सर्व विद्यापीठांच्या आणि अंतिम वर्षांच्या परीक्षा यंदा रद्द करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने (Delhi Government) घेतला...
Read More
post-image
महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आणखी एका नगरसेविकेला कोरोना

पिंपरी- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 च्या नगरसेविका कमल घोलप यांची दोन दिवसांपूर्वी केलेली कोरोना चाचणी पॉझीटिव्ह (Corona Test)आली आहे. त्यांच्यासह त्यांचे पती, 9 वर्षाची पुतणी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

धारावीपाठोपाठ उत्तर मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, १८ विभागांत एकही नवा रुग्ण नाही

मुंबई –  उत्तर मुंबईत कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असल्यामुळे आरोग्य प्रशासनाने या भागातील कोरोनाला रोखण्यासाठी हाती घेतलेल्या कोरोनाचे शून्य रुग्ण मोहिमेला आता यश येताना...
Read More