न्यायालयात हृदयविकाराचा झटक्याने वकिल श्रीराम परब यांचे निधन – eNavakal
मुंबई

न्यायालयात हृदयविकाराचा झटक्याने वकिल श्रीराम परब यांचे निधन

वसई – वसई न्यायालयात कार्यरत असलेल्या 40 वर्षीय वकिल श्रीराम परब यांचा आज हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ते न्यायालयात काम करत होते. श्रीराम परब मुळचे सिंधुदुर्ग येथील मात्र कामानिमित्त वसईत जानकी सिनेमा जवळ असलेल्या पांडुरंग निवास येथे स्थायिक झाले होते. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी वसई न्यायालयात काम करण्यासाठी परब आले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांचे सहकारी जेष्ट वकिल नोएल डाबरे आणि इतरांनी त्वरित रमेदी येथील डिसोझा रुग्णालयात दाखल केले.  मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांना यश आले नाही आणि अखेर वकील श्रीराम परब यांची प्राणज्योत मालवली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

राखी सावंत नवऱ्यासोबत येणार बिग बॉसच्या घरात?

मुंबई – सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय रियालिटी शो असलेल्या हिंदी ‘बिग बॉस’चा तेरावा सीजन लवकरच सुरू होणार आहे. यावेळी घरात कोणकोणते कलाकार असणार याबाबत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More