नोकरीचे आमिष दाखवल्याप्रकरणी; ओमन येथून भारतीय महिलेची सुटका – eNavakal
गुन्हे देश विदेश

नोकरीचे आमिष दाखवल्याप्रकरणी; ओमन येथून भारतीय महिलेची सुटका

नवी दिल्ली – नोकरीचे आमिष दाखवून दुबई मार्गे ओमान देशात नेलेल्या महिलेला परत मायदेशी भारतात आण्यात यश आले आहे. सदर महिला ही तेलंगाना येथील हैदराबादमध्ये राहत असून खाजगी ऐजेंटमार्फत परदेशात नौकरी देतो हे कारण सांगून नेण्यात आले होते. मात्र भारतीय परराष्ट्र  मंत्रालयाच्या सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नाने या महिलेला ओमन येथून परत आणण्यात यश आले आहे.

यावर महिलेच्या माहितीप्रमाणे एका खाजगी एजेंटने मला दुबईमधील सुपरमार्केटमध्ये सेल्सगर्लची नोकरी देण्याचे कबुल केले. दरम्यान यात मला १८ मार्च रोजी अगोदर शारजाह येथील एका कार्यालयात मला बसणवण्यात आले तसेच काही वेळेनंतर एक शेख नावाचा व्यक्ती मला बेहरन मार्गे ओमन येथे घेऊन गेला. यात मला त्याच्याच घरी घरकाम करण्यासाठी ठेवले. या दरम्यान मला खूप त्रास देण्यात आला होता, जेवण देखील कमी प्रमाणात देण्यात येत होते. असे पीडित महिलेद्वारे सांगण्यात आले. हा संपूर्ण प्रकार संबंधित महिलेने तिच्या आईला सांगितला असता, महिलेच्या कुटुंबाने तात्काळ मूसकॅट येथील भारतीय दूतावासाला कळवले असता या महिलेला वाचवण्यात यश आले असून या महिलेने तिच्या  मदतीसाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे विशेष आभार मानले आहे.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राधाकृष्ण विखे-पाटलांच्या मंत्रिपदाविरोधात याचिका

मुंबई – काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे भाजपने गृहनिर्माण मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

साध्वी प्रज्ञाने शपथ घेताना गुरुचे नाव घेतल्याने गदारोळ

नवी दिल्ली – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या भोपाळच्या भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सोमवारी संसदेच्या अधिवेशनात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

डॉक्टरांच्या संपामुळे तब्बल ४० हजार शस्त्रक्रिया रद्द

नवी दिल्ली – पश्‍चिम बंगालमधील संपकरी डॉक्टरांना पाठींबा देण्यासाठी काल देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. या संपात विविध राज्यांतील डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या दहशतवादी हल्ला देश

काश्मीरमध्ये २४ तासांत ३ दहशतवादी हल्ले! १ जवान शहीद, १२ जखमी

नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमध्ये सोमवारी झालेल्या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले मात्र एक जवान शहीद झाले. सोमवारी काश्मीरमध्ये ३ ठिकाणी चकमक झाली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

२४ जूनपर्यंत मान्सून राज्यात सक्रीय होणार

पुणे – वायू चक्रीवादळामुळे देशाच्या अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. परंतु सध्या पूर्ण महाराष्ट्राला वेध लागले आहेत ते मान्सूनचे. ‘वायू’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होत...
Read More