नोव्हेंबरपासून बायोमेट्रीक हजेरीशी वेतन जोडण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय – eNavakal
News मुंबई

नोव्हेंबरपासून बायोमेट्रीक हजेरीशी वेतन जोडण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय

मुंबई- देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने कर्मचार्‍यांवर लक्ष हजेरी तपासण्यासाठी बायोमेट्रीक यंत्रणा अंमलात आणली मात्र ही यंत्रणा ठेपाळली असताना सुद्धा पालिका प्रशासनाने कमॅचार्‍यांवर बायोमेट्रिकची सक्ती केली आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून बायोमेट्रिक हजेरीशी वेतन जोडण्याचा निर्णय घेतला आहे ही यंत्रणा ठेपाळली असल्याने कर्मचार्‍यांची बायोमेट्रिक हजेरीची मोठी गैरसोय होणार असून कामगारांचे आर्थिक नुकसान होत आहे. परिणामी कामगारांमध्ये बायोमेट्रिक हजेरीबाबत मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली असून बायोमेट्रीक मशीन ठिकठिकाणी बंद पडत असल्याने व काही ठिकाणी चालत नसल्याने कमॅचा-यांना मोठी धावपळ करावी लागत आहे.

मुंबई पालिकेत एक लाख 11 हजार कमॅचारी काम करित आहेत कमॅचा-यांच्या बायोमेट्रिक हजेरी वेतनाशी जोडण्याचा निर्णय आज शनिवारी पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून बायोमेट्रिक हजेरीला कामारांनी विरोध केला आहे. बायोमेट्रिक हजेरीसाठी लावलेली यंत्रे सतत बंद पडत आहेत. अनेकवेळा कनेक्टिविटी नसते. रात्रपाळीसाठी आलेला कामगार इन होतो. मात्र सकाळी तो घरी जात असताना आऊट असे दाखविले जात नाही. तर तो सिस्टिममध्ये इन असेच दाखविले जाते. जादा काम केलेलेही सिस्टिममध्ये दाखविले जात नाही. बायोमेट्रिक हजेरीसाठी पुरेशा यंत्रे नाहीत. तरीही येत्या 1 नोव्हेंबर रोजी बायोमेट्रिक यंत्रणा वेतनाशी जोडली जाणार आहे. जर यंत्रणा सक्षम नसेल तर बायोमेट्रिकची सक्ती कशासाठी असा सवाल कामगार करीत आहेत. काम करूनही आर्थिक नुकसान कामगारांना सहन करावे लागत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. 20 कर्मचार्‍यांमागे एक बायोमेट्रिक यंत्र उपलब्ध केले जाईल. काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास कर्मचार्‍यांना त्यांची हजेरी नोंदविण्यासाठी पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी सर्व खात्यांमध्ये आणि सर्व प्रशासकीय विभागांमध्ये बायोमेट्रिक यंत्रे पुरेशी ठेवण्यात येतील अशी ग्वाही पालिका प्रशासनाने दिली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More