नेहरु मैदान ”शांतता” क्षेत्र असताना परवानगी न घेता विवाह सोहळे – eNavakal
News मुंबई

नेहरु मैदान ”शांतता” क्षेत्र असताना परवानगी न घेता विवाह सोहळे

डोंबिवली – कल्याण – डोंबिवली महापालिकेने अनेक सार्वजनिक जागा शांतता क्षेत्र म्हणून घोषित केल्या असून डोंबिवलीतील प्रसिद्ध नेहरु मैदानही यामध्ये आहे .मात्र, या मैदानात गेल्या काही दिवसात पालिकेची परवानगी न घेता राजरोस विवाहसोहळे होत असून याचा स्थानिक नागरिकांना त्रास होत आहे.
स्थानिक खेळाडूंनी या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार नेहरु मैदान हे पालिकेने ”शांतता क्षेत्र ”म्हणून घोषित केले आहे.मुळात डोंबिवलीत हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच मैदाने असून खेळासाठी ते अपुरे पडत आहे.महापालिकेने नुकतीच या मैदानाची दुरुस्ती केली असून मैदानावर लाल माती टाकुन मैदान सपाट केले आहे .यामुळे आता या मैदानावर पूर्वीपेक्षा जास्त वावर वाढला आहे. मात्र या मैदानावर गेले काही दिवस विवाह होत असून शांतता क्षेत्र असताना हे का होत आहे असा सवाल खेळाडू करत आहेत.मैदानावर मांडव घालण्यात आला असून विवाह समारंभाची भांडी आणून ठेवली आहेत.स्थानिक नागरिकांनीही या संदर्भात तक्रार केली असून पालिका प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. या मैदानात स्थानिक रहिवासी पूर्वीपासून रहात असून त्यांचेही आता अतिक्रमण वाढले आहे. तसेच एक जैन मंदिर बांधण्यात येत आहे. यामुळे मैदान दिवसेदिवस आकुंचन होत आहे.
नेहरु मैदान शांतता क्षेत्रा संदर्भात ”फ ”प्रभागाचे प्रभागक्षेत्र अधिकारी अमित पंडित यांना विचारले असता ,त्यांनी हि नेहरु मैदान हे शांतता क्षेत्र असून हे मैदान कुणालाही विवाहासाठी भाडयाने दिले जात नाही .तरीही जर हे कोणी वापरत असेल तर त्यांच्यावर करवाई करण्यात येईल असेहि त्यांनी सांगीतले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More