नेस वाडिया विरोधातील खटला रद्द – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

नेस वाडिया विरोधातील खटला रद्द

मुंबई – अभिनेत्री प्रिती झिंटाने उद्योगपती नेस वाडिया याच्याविरोधात छेडछाडीचा खटला दाखल केला होता. मात्र, आज मुंबई उच्च न्यायालयाने वाडियावरील आरोप रद्द करत त्याला मोठा दिलासा दिला आहे.

प्रिती झिंटाने २०१४ मध्ये नेस वाडियांविरोधात छेडछाडीचे आरोप केले होते. ‘३० मे २०१४ रोजी पंजाब इलेव्हन किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांदरम्यान आयपीएल सामना सुरू असताना मला वानखेडे मैदानाच्या गरवारे पॅव्हेलियनमध्ये बसलेले पाहून नेसने तिकीट वाटपावरून टीमच्या कर्मचाना सर्वांदेखत शिवीगाळ केली. त्यानंतर मी माझी जागा बदलली. सगळ्या टीम सदस्यांदेखत मला शिवीगाळ केली आणि असभ्य वर्तन केले. माझा हात खेचत माझा विनयभंग केला,’ असा आरोप प्रीतीने केला होता. नेस यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले होते.

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयात नेसविरोधात २०० पानी आरोपपत्र दाखल केले होते. आयपीसी कलम ३५४ म्हणजे हल्ला करणे, कलम ५०६ गुन्हेगारी स्वरूपाचा त्रास देणे, कलम ५०९ विनयभंग करणे या कलमांअतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. मात्र, खटला सुरू होण्याआधीच नेस यांनी आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात ही याचिका केली होती. याप्रकरणी न्यायालयाने प्रितीकडूनही उत्तर मागितले होते. शिवाय दोघांनाही आपसांत वाद मिटवण्याचा सल्लाही न्यायालयाने दिला होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

वाहन परवान्यासाठी आता शैक्षणिक अट नाही

नवी दिल्ली – वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) मिळवण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रतेची अट काढून टाकण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे यापुढे वयाची...
Read More
post-image
महाराष्ट्र शिक्षण

अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

मुंबई – इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला आजपासून सुरुवात झाली आहे. बायफोकल वगळता इतर शाखांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २९ जूनपर्यंत सुरू राहणार असून पहिली गुणवत्ता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘एक डाव धोबीपछाड’

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य ‘एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि राजस्थानच्या कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ५७ वर्षीय बिर्ला यांनी आठवेळा खासदार राहिलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राहुल गांधींचा आज वाढदिवस! पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक प्रचारात भाजपा सरकारला तगडी टक्कर देणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. माजी पंतप्रधान राजीव...
Read More