नेरूळ-उरण रेल्वे मार्ग दिवाळीनंतरच सुरू होणार – eNavakal
News महाराष्ट्र

नेरूळ-उरण रेल्वे मार्ग दिवाळीनंतरच सुरू होणार

नेरूळ -नेरूळ – उरण हा रेल्वे मार्ग सुरू होण्यासाठी महिनाभराची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. सिडकोने बांधलेली रेल्वे स्थानकं सज्ज असून रेल्वेकडून चाचणी केली जात आहे. तांत्रिक चाचण्या अजून बाकी आहेत. त्यामुळे दिवाळीनंतरच हा मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. नेरूळ ते उरण दरम्यानच्या प्रस्तावित स्थानकात फलाट बांधून झालेत. तिकीट खिडक्या, मार्गीका, जीने बांधून तयार आहेत. रूळ तपासणी आणि विद्युतप्रवाह जोडण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं होतं. 15 ऑक्टोबरपर्यंत ही सेवा सुरू होईल, असं सिडकोने म्हटलं होतं. पण ही सेवा सुरू होण्यास आणखी महिनाभराचा विलंब लागू शकतो. सिडकोकडून रेल्वे स्टेशन पूर्ण झाली असली तरी, रेल्वे प्रशासनकडून या मार्गाची तांत्रिक चाचणी करण्याचे काम सुरू आहे. यातील महत्वाच्या चाचण्या बाकी आहेत. त्याचप्रमाणे या मार्गावर चालवण्यात येणार्‍या ट्रेनची (रेक) व्यवस्था अजून करण्यात आलेली नाही. यामुळे हा मार्ग सुरू होण्यास विलंब लागणार यात शंका नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

वाहन परवान्यासाठी आता शैक्षणिक अट नाही

नवी दिल्ली – वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) मिळवण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रतेची अट काढून टाकण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे यापुढे वयाची...
Read More
post-image
महाराष्ट्र शिक्षण

अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

मुंबई – इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला आजपासून सुरुवात झाली आहे. बायफोकल वगळता इतर शाखांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २९ जूनपर्यंत सुरू राहणार असून पहिली गुणवत्ता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘एक डाव धोबीपछाड’

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य ‘एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि राजस्थानच्या कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ५७ वर्षीय बिर्ला यांनी आठवेळा खासदार राहिलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राहुल गांधींचा आज वाढदिवस! पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक प्रचारात भाजपा सरकारला तगडी टक्कर देणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. माजी पंतप्रधान राजीव...
Read More