काठमांडू – नेपाळ महिला क्रिकेट संघाची फिरकी गोलंदाज अंजेली चाँदने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत मालद्विव विरुद्ध झालेल्या टी-20 सामन्यात अवघ्या 2.1 षटकांत एकही धाव न देता प्रतिस्पर्धी संघाचे 6 बळी टिपून टी-20 सामन्यात नवा विश्वविक्रम साजरा केला.
या अगोदर असा पराक्रम कुठल्याच क्रिकेट पटूला करता आला नाही. मालदिवचा संघ अवघा 16 धावा करू शकला. त्यांच्या एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या काढता आली नाही. तर दोन फलंदाजांनी दोन आकडी धावसंख्या काढली. अन्य आठ फलंदाज भोपळादेखील फोडू शकले नाही. अंजलीने या सामन्यात आपली हॅट्ट्र्रिकदेखील साजरी केली. नेपाळने विजयी लक्ष 5 चेंडूंतच गाठले.
या अगोदरचा विक्रम मलेशियाच्या एलिसाच्या नावावर जमा होता. तिने चीन विरुद्धच्या टी-20सामन्यात 6 धावांत तीन बळी टिपले होते. तर पुरुषांच्या सामन्यात हा विक्रम भारताच्या दिपक चहरच्या नावावर जमा असून, त्याने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात 7 धावांत सहा बळी टिपले.
