नेतन्याहू यांची मोशेसोबत छबाड हाउसला भेट, 26/11 तील मृतांना वाहिली आदरांजली – eNavakal
अन्य देश मुंबई

नेतन्याहू यांची मोशेसोबत छबाड हाउसला भेट, 26/11 तील मृतांना वाहिली आदरांजली

मुंबई- इस्त्रायली पंतप्रधान बेंझामिन नेतन्याहू यांनी आज दुपारी मुंबईतील 26/11 हल्लातील शहीद आणि मृत्यूमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना आदरांजली वाहिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दक्षिण मुंबईतील ताज महाल पॅलेस हॉटेलमधील स्मृतीस्थळावर कडक सुरक्षेव्यवस्थेत नेतन्याहू यांनी या हल्ल्यात बळी गेलेल्या 166 जणांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी तेथील व्हिजिटर बुकलेटमध्ये त्यांनी खास संदेश लिहिला. यानंतर त्यांनी लहानग्या मोशेसोबत नरिमन पाईंट येथील छबाड हाऊसला भेट दिली.
नेतान्याहू यांनी 11 वर्षाच्या इस्त्रायली मुलगा मोशे हॉजबर्ग याचीही भेट घेतली. यावेळी मोशेचे आजोबा व त्याचा संभाळ करणारी भारतीय आई उपस्थित होती. मोशेचे पिता रबी गेवरिल हॉजबर्ग आणि आई रिवका नरीमन हाऊसरध्ये 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ल्यात मारले गेले होते. छबाड हाऊसला नेतन्याहू भेट देणार असल्याने मोशे मंगळवारीच मुंबईत दाखल झाला आहे.
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आपल्या भारत दौ-याच्या पाचव्या दिवशी आज मुंबईतील सीईओ यांच्या बिजनेस सेमिनारमध्ये सहभागी झाले. सायंकाळी ते शलोम नावाच्या एका बॉलिवूडच्या प्रोग्रॅममध्ये सहभागी झाले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉलिवूड पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती.
नेतन्याहू काल रात्री उशिरा पत्नी सारासोबत मुंबईत दाखल झाले. एयरपोर्टवर सीएम देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. ते मुंबईतील हॉटेल ताजमध्ये थांबले आहेत. नेतन्याहू यांनी आज सकाळी हॉटेल ताजमध्ये मोठ्या उद्योगपतीशी चर्चा केली. यात आनंद महिंद्रा, अजय पिरामल, अदी गोदरेज आणि चंदा कोचर यांचा समावेश होता. सीईओच्या बिजनेस सेमिनारमध्ये भाग घेताना नेतन्याहू म्हणाले की, येणारा काळ फक्त इनोव्हेटिव्ह लोकांचाच असेल. आम्ही तुम्हाला फक्त प्रोत्साहित करू शकतो, सपोर्ट करू शकतो.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

दुष्काळाबाबत लवकरच जीआर काढणार – मुख्यमंत्री

मुंबई – ३१ ऑक्टोबरनंतर राज्यातील तब्बल 179 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जाहीर केले. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
क्रीडा

ही आहे धोनीची नवी स्टाईल

नवी दिल्ली – भारत विरुध्द वेस्टइंडीज यांच्यातील पहिला सामना रविवारी खेळण्यात आला, त्यादरम्यान टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने स्वत:चे काही फोटो सोशल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

फेरीवाला धोरणाची काटेकोर अमंलबजावणी करा – राज ठाकरे

मुंबई – मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून  फेरीवाला धोरणाची आणि त्यातल्या नियमाची काटेकोर अमंलबजावणी करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्र...
Read More
post-image
लेख

अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

आज प्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेत्री आणि नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांची पुण्यतिथी. त्यांचा जन्म २२ मार्च १९७२ साली झाला. अश्विनी एकबोटे माहेरच्या अश्विनी काटकर, त्यांनी बालपणी नंदनवन...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा मुंबई

सचिन-विनोदची जोडी पुन्हा मैदानात

मुंबई – शालेय जीवनापासून ते भारतीय संघातील ‘जय-विरू’ म्हणजेच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ही जोडी पुन्हा एकदा मैदानांवर एकत्र दिसणार आहे. अलीकडच्या काही वर्षात दोघांच्या मैत्रीमध्ये...
Read More