नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे एक हेक्टरपयर्र्ंतचे कर्ज माफ! मुख्यमंत्र्यांची घोषणा – eNavakal
News महाराष्ट्र मुंबई

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे एक हेक्टरपयर्र्ंतचे कर्ज माफ! मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई – राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण, नाशिक भागात अतिवृष्टी झालेली. या भागांत पुराने केलेल्या कहरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील नागरिकांचे जनजीवन सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. पूरग्रस्त भागातील ज्या शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकर्‍यांचे एक हेक्टरपयर्र्ंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. तसेच पुरामध्ये ज्यांची घरे कोसळली आहेत त्यांना घरे बांधण्यासाठी 5 ब्रास वाळू आणि मुरुम मोफत देण्याचा निर्णयही घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, एक हेक्टरपर्यंत ज्या शेतकर्‍यांनी काही पिके घेतली आहेत. त्या पिकांसाठी घेतलेले कर्ज आम्ही माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीन, ऊस यासाठी घेतलेल्या जास्तीत जास्त कर्जाची रक्कम माफ करण्याचे आम्ही ठरवले आहे. ज्यांनी कर्जच घेतले नाही आणि पिकांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकर्‍यांना तीनपट भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांना दिलासा देण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान आवास योजनेतून ज्या घरांचे नुकसान झाले आहे. ती घरे बांधून देणार आहोत. पंतप्रधान आवास योजनेतून मिळणारे दोन लाख आणि त्याच्यावर 1 लाख रुपये अतिरिक्त राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार आहेत. तसेच घर बांधण्याकरिता 5 ब्रास वाळू आणि 5 ब्रास मुरुम मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही तत्यांनी सांगितले. पूरग्रस्त गावे दत्तक घेण्यासाठी अनेक संस्था पुढे येत आहे. त्या संस्था गाव दत्तक घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्या संस्थांना घरे आणि लोकांना मूलभूत सुविधा पुरविण्याचे आम्ही आवाहन करत आहोत. तसेच त्यांची मदत सरकारी मदतीशी जोडून जास्तीत जास्त पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. जनावरांच्या गोठ्यासाठीही अर्थसहाय्य करण्याचं ठरवलं असून त्यासाठी 1 लाख रुपये मदतनिधी देण्यात येणार आहे. या पुरात व्यापार्‍यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा व्यापार्‍यांना जीएसटीतून दिलासा देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्याशी बोलणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
विदेश

अमेरिकन कंपनीकडून कोरोनावरील लसीची मानवी चाचणी सुरू

कॅनबरा – कोरोना व्हायरसचा जगभर कहर सुरू असताना आता एक आशेचा किरण दिसू लागला आहे. एका अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनीने यावर लस शोधली आहे. या...
Read More
post-image
देश मुंबई

मुंबई शेअर बाजारात तेजी

मुंबई – जगभरातील शेअर मार्केटमधून आलेल्या सकारात्मक संकेतामुळे भारतीय शेअर बाजारातही आज सकाळी तेजीचे वातावरण होते. सकाळी तेजीत उघडलेल्या बाजारात निफ्टी ९,१००च्या वर ओपन झाला,...
Read More
post-image
महाराष्ट्र

आता ठाण्यात पोलिसांच्या मदतीला रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स

ठाणे – ठाण्यात पोलिसांच्या मदतीला आता रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट आणि कळवा-मुंब्रा परिमंडळात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत...
Read More
post-image
महाराष्ट्र

आयटी इंजिनियरच्या आत्महत्येनंतर वाकडमधील सोसायट्यांनी अविवाहितांना घरे नाकारली

पुणे – पुण्याच्या आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या आणि वाकड येथे राहणाऱ्या बिहारच्या प्रसून कुमार झा या इंजिनियरने 28 एप्रिल रोजी तो राहत असलेल्या इमारतीच्या...
Read More
post-image
Uncategoriz

दोन अल्पवयीन मैत्रिणींचा वीजेच्या तारेला चिटकून मृत्यू

अहमदनगर – समृद्धी महामार्गावर सुरू असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारेला चिटकून दोन अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना कोपरगाव तालुक्यातील जेऊरकुंभारी हद्दीत...
Read More