नीलपंख पक्षी निवडणूक जिंकला – eNavakal
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

नीलपंख पक्षी निवडणूक जिंकला

वर्धा – नगरपालिका आणि बहार नेचर फाऊंडेशनद्वारे घेण्यात आलेल्या शहरपक्षी निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवत इंडियन रोलर म्हणजेच भारतीय निलपंख हा पक्षी वर्धा नगरीचा शहरपक्षी म्हणून निवडून आला. निलपंख पक्षाला शुभंकर म्हणूनही ओळखले जाते. अंतिम फेरीत नीलपंखला २९ हजार ८३५ मते तर प्रतिस्पर्धी किंगफिशरला ६ हजार ९५० मते प्राप्त झाली.

तब्बल ५४ दिवस चाललेल्या या निवडणुकीत पहिल्याच फेरीत नीलपंखने १० हजार ९४० मतांपैकी ५ हजार ९८८ मते घेत आघाडी मिळवली. पाच फेऱ्यांंनंतर एकूण मतांच्या ५८ टक्के मते प्राप्त केलेल्या नीलपंखांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. एकूण 5१ हजार २६७ नागरिकांनी मतदान केले होते. त्यापैकी ४७ हजार ६४६ नागरिकांनी मतपत्रिकेद्वारे तर देश-विदेशात स्थायिक झालेल्या ३ हजार ६२१ वर्धेकरांनी ऑनलाईन पद्धतीने मतदान केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

विराटला कोणतीच ताकीद दिली नाही – बीसीसीआय

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला माध्यमे आणि चाहत्यांशी नम्रतेने वाग अशी ताकीद बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने दिली असे वृत्त काही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

सई आणि ‘तो’

मुंबई – मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरच्या एका फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सईने एका तरुणासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. सईनं या फोटोकॅप्शनमध्ये पिवळ्या हार्ट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

नाशिक-कल्याण प्रवास अधिक सोयीचा होणार

नाशिक – प्रवाशांना नाशिक-कल्याण प्रवास आता अधिक सोयीचा होणार आहे. कारण लवकरच नाशिक-कल्याण लोकल सुरू होणार आहे. येत्या 15 दिवसांत या लोकलची चाचणी घेण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

अकोले तालुक्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या

अकोले – अकोले शहरातील उपनगरातील गजबजलेल्या परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एकाच वेळी सहा ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून घरफोड्या केल्या. या सहा ठिकाणी...
Read More
post-image
देश

गडचिरोलीत दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील धानोरी तालुक्यात दोन महिला माओवादींना गोळ्या झाडून ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली....
Read More