नीरा-देवघर पाण्यावरून उदयनराजेंचा राष्ट्रवादीला घरचा आहेर – eNavakal
महाराष्ट्र

नीरा-देवघर पाण्यावरून उदयनराजेंचा राष्ट्रवादीला घरचा आहेर

सातारा – खासदार उदयनराजे भोसले यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता टीका करत नीरा देवघर पाणी प्रश्नावरून पक्षाला घरचा आहेर दिला आहे. नीरा डाव्या कालव्याचा वाद वाढल्यानंतर राज्य सरकारने बारामतीला जाणारे ६० टक्के पाणी हे माढ्याला देण्याचे आदेश दिले होते. जलसंपदा खात्याने अध्यादेश काढल्याची माहिती खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी दिली होती. त्यानंतर आज उदयनराजे भोसले यांनी १४ वर्षात अध्यादेश का काढला नाही? असा सवाल करत पदाचा केवळ वापर केला आणि लोकांची खिल्ली उडवली, जमिनी लाटण्यासाठी लोकांना पाण्यापासून दूर ठेवले, अशी टीका केली आहे. तसेच देव यांना कधीच माफ करणार नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, बारामतीचे पाणी दुसरीकडे वळविण्यात आल्यानंतर शरद पवार कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या बी777 फ्लाइट ए-191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More