नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय विदेश

नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई – पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा गंडा घालणारा हिरे व्यापारी नीरव मोदीचा जामीन अर्ज वेस्टमिंस्टर न्यायालयाने फेटाळला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २४ मे रोजी होणार आहे. मोदीला जामीन मिळू नये यासाठी तपास यंत्रणांनी कोर्टात अत्यंत दमदारपणे आपली बाजू माडंली होती.

पंजाब नॅशनल बँकेत जवळजवळ 13,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले हिरे व्यापारी नीरव मोदी यांना लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. बँकेत नवे खाते खोलण्यासाठी गेला असताना स्कॉटलँड यार्ड पोलिसांनी मध्य लंडनमध्ये नीरव मोदीला अटक केले होते. मोदी आणि चोक्सीने डायमंड आर यूएस, सोलार एक्सपोर्टस आणि स्टीलकर डायमंड या तीन कंपन्यांच्या माध्यातून पंजाब नॅशनल बँकेत १३,५०० कोटी रुपयांचा घोटळा केला. हा घोटाळ उघड होण्याच्या काही आठवडे आधी जानेवारी २०१८च्या पहिल्या आठवडयात मोदी आणि चोक्सी दोघे देशसोडून पसार झाले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन

मुंबई – आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत...
Read More
post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More