नीरव मोदीच्या पत्नीविरोधात वॉरंट – eNavakal
News गुन्हे न्यायालय

नीरव मोदीच्या पत्नीविरोधात वॉरंट

मुंबई- पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून लंडनला फरार झालेल्या नीरव मोदी यांच्या पत्नीविरोधात विशेष न्यायालयाने अजामीपात्र वॉरंट बजावले आहे. ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेत विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी हे आदेश दिले आहेत. नीरव मोदी यांच्या पत्नीचे नाव अमी मोदी असून, मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत विशेष न्यायालयाने हे वॉरंट बजावले आहे. पीएनबी बँकेतील घोटाळ्यात अमी मोदी यांचा सहभाग असून, परदेशी बँक खात्याचा वापर करून सुमारे 30 दशलक्ष डॉलची रक्कम वळती केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या रकमेचा वापर न्यूयॉर्क येथील सेंट्रल पार्क येथे मालमत्ता विकत घेण्यासाठी करण्यात आला, असा आरोप ईडीने आरोपपत्रात केला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

कुकडी नदीवरील बंधारा पाण्याअभावी कोरडाच

कवठे येमाई – शिरूर तालुक्यातील म्हसे बुद्रुक येथील कुकडी नदीवरील बंधारा अखेर पाण्याअभावी कोरडाच राहिला असून पाणी न आल्यास या प्रश्नी तीव्र आंदोलन करण्याचा कडक...
Read More
post-image
News देश निवडणूक

बिहारमध्ये महाआघाडीचे जागावाटप जाहीर

पाटणा – लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये आज महाआघाडीच्या जागावाटपाची घोषणा झाली. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, हिंदुस्थानी आवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक समता पार्टी या पक्षांच्या महाआघाडीने...
Read More
post-image
News महाराष्ट्र

एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आक्रमक

रत्नागिरी – एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आता आक्रमक झाले आहेत. याच विषयासंदर्भात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात...
Read More
post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More