नीरव मोदीचा पत्ता सापडला इंग्लंडच्या मँचेस्टर शहरात राहतो – eNavakal
आघाडीच्या बातम्या विदेश

नीरव मोदीचा पत्ता सापडला इंग्लंडच्या मँचेस्टर शहरात राहतो

नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बँकेत 11 हजार कोटींचा घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदीचा पत्ता सापडला आहे. नीरव मोदी इंग्लंडमधील मँचेस्टर शहरात राहतो. ब्रिटिश यंत्रणांनी ही माहिती भारताला दिली आहे, अशी माहिती भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी राज्यसभेत दिली.

नीरव मोदीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासंदर्भात भारत सरकारने 2018 च्या ऑगस्टमध्ये ब्रिटन सरकारला विनंतीचे दोन अर्ज पाठविले होते. त्यापैकी एक अर्ज सीबीआयचा तर दुसरा अर्ज अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) आहे. त्यानंतर इंग्लंडच्या मँचेस्टर नॅशनल सेंट्रल ब्युरोने नीरव मोदी हा मँचेस्टरमध्ये राहात असल्याचे कळविले. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने जून महिन्यात अनेक युरोपियन देशांना पत्र लिहून नीरव मोदीचा ठावठिकाणा शोधण्याची विनंती केली होती. नीरव मोदी हा पंजाब नॅशनल बँकेतील 11,300 कोटींपेक्षा जास्त रक्कमेच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहे. या घोटाळ्यातील दुसरा आरोपी मेहुल चोक्सीने 41 तासांचा विमान प्रवास करून भारतात परतणे अशक्य असल्याचे म्हटले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई – विधान परिषदेतील उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More