नीट परीक्षेत चुकीची उत्तरे! आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश शिक्षण

नीट परीक्षेत चुकीची उत्तरे! आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली – वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीटच्या परीक्षेच्या चॅलेंज अन्सर कीने दर्शविलेल्या चुकीच्या उत्तरांप्रकरणी ४ विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार अन्सर कीने ५ प्रश्नांची उत्तरे चुकीची दर्शविली. त्यामुळे पुनर्परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी आणि न्यायाधीश अजय रस्तोगी यांच्या खंडपीठासमोर ही याचिका दाखल करण्यात आली.

दरम्यान, वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची ५ मे रोजी देशभरात प्रवेश परीक्षा (नीट) घेण्यात आली होती़ या परीक्षेची चॅलेंज अन्सर की या परीक्षेकरिता नियुक्त करण्यात आलेल्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने www.ntaneet.nic.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये चुकीची उत्तरे दर्शविल्याची बाब उघड झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

चिदंबरम यांच्या भेटीला सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहारमध्ये

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज तिहार रुग्णालयात जाऊन ‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला

मुंबई – मोदी सरकारकडून शुक्रवारी कंपनी करात करण्यात आलेल्या कपातीनंतर आज शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने जवळपास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

अनुष्का शर्माचा देशातील सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत समावेश

नवी दिल्ली – मिसेस कोहली अर्थात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला भारतातील सामर्थ्यशाली स्री म्हणून घोषित करण्यात आले आहे. फॉर्च्यून इंडियाने भारतातील ५० सामर्थ्यवान...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – द्रूतगतीवरची कासवगती

केंद्रीय वाणिज्य आणि रेल्वे मंत्री यांना मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला आणि त्यांनी मुंबईकर कसे संयमी आहेत, असा पलटवार करून वेळ मारून नेली. परंतु...
Read More
post-image
मुंबई

घाटकोपरमध्ये कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या

मुंबई – घाटकोपर येथे कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान घाटकोपर येथे मयांक ट्युटोरियल...
Read More