शेतकऱ्यांवर निसर्गाची अवकृपा! बिहारमध्ये वीज कोसळून २६ जणांचा मृत्यू – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

शेतकऱ्यांवर निसर्गाची अवकृपा! बिहारमध्ये वीज कोसळून २६ जणांचा मृत्यू

पटना – काही दिवसांपूर्वी वीज कोसळल्याने बिहारमध्ये १०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता. आज परत वीज कोसळल्याने २६ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी ७ वाजता ही घटना घडली. बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला असून तिथं ७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईंकांसाठी नितीश कुमार यांनी ४ लाखांची नुकसान भरपाईची घोषणा केली आहे.

पाटणा येथे असलेल्या बिहार राज्य आपात्कालीन संचालन केंद्राने एक लिस्ट जारी केली आहे. या लिस्टमध्ये आठ जिल्ह्यांतील २६ लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. या लिस्टनुसार, समस्तीपुर जिल्ह्यात ७, राजधानी पाटणात ६ तर पूर्वी चंपारणमध्ये चार, शिवहरमध्ये दोन, कटीहारमध्ये ३, मधेपुरामध्ये दोन आणि पूर्णिमा व पश्चिमी चंपारणमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतेकांचा मृत्यू शेतात झाला आहे. सध्या बिहारमध्ये लावणी सुरू आहे. त्यामुळे लोक दिवसभर शेतात राबत असतात. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतात राबत असतानाच २६ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

भगतसिंह कोश्यारींकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त पदभार

पणजी – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त ताबा सोपविण्यात आला आहे. गोवा राज्याचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांची बदली झाल्याने...
Read More
post-image
देश

गुजरात सरकारचा मोठा निर्णय; पाच शहरात ७० मजली इमारती

गांधीनगर – गुजरात सरकारने दुबई आणि हॉंगकाँगप्रमाणे गुजरातच्या पाच शहरांमध्ये गगनचुंबी इमारती उभारण्याचे ठरविले आहे. गुजरातच्या गांधीनगर, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि सुरत या शहरांमध्ये...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश मुंबई

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ

नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. एकीकडे पेट्रोलच्या दरात वाढ होत असली तरी...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

खासदार ओमराजे निंबाळकर हल्ला प्रकरण! फरार झालेला आरोपी जेरबंद

उस्मानाबाद – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरवर यांच्यावर चाकू हल्ला करणारा आरोपी अजिंक्य टेकाळे हा अचानक पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. त्यानंतर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुन्हा रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने शहांना सोमवारी रात्री एम्स रुग्णालयात दाखल...
Read More