निवडणूक आयोगाचे अशोक लवासा संतप्‍त! कोर्टात दाद मागणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

निवडणूक आयोगाचे अशोक लवासा संतप्‍त! कोर्टात दाद मागणार

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान यंदा प्रथमच आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारींबाबतच्या निर्णयावरून निवडणूक आयोगावर पक्षपाती निर्णय घेतल्याची टीका सातत्याने झाली. निवडणूक आयोग मोदी आणि शहांचे गुलाम बनले आहे असे काँग्रेसने जाहीरपणे म्हटले. या आरोपांना पुष्टी देणारी अत्यंत गंभीर घटना घडली आहे. निवडणूक आयोगाचे सदस्य अशोक लवासा यांनी कोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणूक आयोगाचे अध्यक्ष सुनील अरोरा यांच्यासह अशोक लवासा व आणखी एकजण अशी तीन सदस्य समिती आहे. निवडणूक आचारसंहिता व इतर निमकायदेशीर बाबींबाबत ही समिती निर्णय घेते. मात्र या समितीचे सदस्य अशोक लवासा यांनी म्हटले आहे की, बहुमताच्या जोरावर समितीत निर्णय घेतले जातात. पण मी जेव्हा विरोधी मत मांडतो तेव्हा त्या मताची नोंद केली जात नाही. माझे मत हे अल्पमतातील असले तरी ते रेकॉर्डवर यायलाच हवे. परंतु त्याचा रेकॉर्ड ठेवला जात नाही. मी तक्रार केली तेव्हा सांगण्यात आले की, केवळ निमकायदेशीर बाबी असल्यास त्यावर निर्णय घेताना तिघांच्या मताची नोंद होते. एरवी अल्पमताचा रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक नसल्याचे सांगतात, पण हे खरे नाही. समितीच्या बैठकींचा रेकॉर्ड ठेवलाच पाहिजे.

निवडणूक आयोगाचे अध्यक्ष सुनील अरोरा यांना अशोक लवासा यांनी पत्र पाठवून ही तक्रार केली आहे. याच तक्रारीवर दाद मागण्यासाठी लवासा आता कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत आहेत. निवडणूक आयोग समितीची गेल्या 4 मे रोजी बैठक झाली. त्यानंतर एकही बैठक झाली नाही. या वादामुळेच बैठका झाल्या नाहीत अशी चर्चा आहे. अशोक लवासा यांनी त्यापुढच्या बैठकांना हजर राहू नये आणि विरोधी सूर लावू नये म्हणून त्यांच्यावर दबावही आणण्यात आला. अशोक लवासांनी पत्रात म्हटले आहे की, माझे मत रेकॉर्डवरही आणणार नसले तर मी बैठकीला हजर राहून काय उपयोग आहे? मला बैठकींपासून दूर ठेवण्याचाही प्रयत्न होत आहे.

निवडणूक आयोगाच्या अनेक निर्णयांबाबत गंभीर आक्षेप घेण्यात आले आहे. काँग्रेसने मोदी आणि शहा यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची अद्याप आयोगाने दखल घेतलेली नाही. पश्‍चिम बंगालचा प्रचार वीस तास आधी बंद केल्याप्रकरणीही आयोगावर टीका झाली आहे. नांदेडच्या सभेबाबत मोदींना आणि वायनाडच्या सभेबाबत अमित शहांना क्‍लिनचीट दिल्यानेही वादळ उठले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहा भाषणांवर आणि अमित शहा यांच्या दोन भाषणांवर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र निवडणूक आयोगाने अशोक लवासाना डावलून नरेंद्र मोदी यांना चार भाषणांसाठी आणि अमित शहा यांना एका भाषणासाठी क्‍लीन चीट दिली. त्यांना या भाषणांमध्ये आचारसंहितेचा भंग झाल्याचे दिसले नाही. त्यामध्ये मोदी यांनी गुजरातच्या पाटण येथे 21 एप्रिलला केलेले भाषण, नांदेड येथील भाषण, वर्धा व लातूर येथील भाषणाचा समावेश आहे. गुजरातच्या पाटण येथील सभेत मोदींनी  म्हटले होते की, विंग कमांडर अभिनंदन याला सोडले नसते तर पाकिस्तानसाठी मृत्यूची रात्र ठरली असती. लातूर येथील सभेमध्ये मोदी यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या नावाने मतदान करण्याचे आवाहन नवीन मतदारांना केले होते. या कुठच्याही भाषणात निवडणूक आयोेगाच्या दोन सदस्यांना आचारसंहितेचा भंग आढळला नाही. अशोक लवासा यांनी मात्र हा आचारसंहितेचा भंग असल्याचे सांगितले होते. परंतु त्यांचे मत दाबून टाकण्यात आले.

अशोक लवासा यांच्या तक्रारीनंतर मुख्य निवडणूक आयुक्‍त सुनील अरोरा म्हणाले की, तिघांची मते एक असू शकत नाहीत. शिवाय अशोक लवासा यांनी स्वत:हूनच निवडणूक आयोगाच्या बैठकींपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

…तर मिशा ठेवणार नाही! उदयनराजेंचे आयोगाला आव्हान

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्यावेळी सदोष ईव्हीएम यंत्रांमुळे सातारा मतदारसंघात प्रत्यक्षात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने माझ्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शरद कळसकरला 8 जुलैपर्यंत कोठडी

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज 8 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कळसकरला 8...
Read More
post-image
News मुंबई

सरकारी कर्मचार्‍यांचा 27 जूनला ‘लक्षवेध’ दिन

मुंबई – पाच दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय 60 करावे आणि अन्य मागण्यांसाठी 27 जूनला सरकारी कर्मचारी लक्षवेध दिन पाळणार आहे आणि तरीही मागण्या मान्य...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार! सरकारनेच दिली कबुली

मुंबई – एकीकडे महाराष्ट्र सरकार दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांनी सरसकट कर्जमाफी, चारा छावण्या आणि पाण्याच्या टँकरसह जलयुक्त शिवार योजनेसाठी लाखो कोटी रुपये दिल्याची फुशारकी मारत असतानाच...
Read More
post-image
News महाराष्ट्र

इंद्रायणीचे पाणी दूषित! तीर्थ म्हणून पिऊ नका

आळंदी – आषाढी एकादशी यात्रेनिमित्त ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या प्रस्थानासाठी आळंदीत दाखल झालेल्या भाविकांनी इंद्रायणी नदीतील पाण्याचे तीर्थ म्हणून आचमन करू नये, असे आवाहन दस्तुरखुद्ध...
Read More