निवडणूक आयोगाची प्रचाराला कात्री! प. बंगालमध्ये आजच प्रचार थांबणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

निवडणूक आयोगाची प्रचाराला कात्री! प. बंगालमध्ये आजच प्रचार थांबणार

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचार पाहता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. १९ मे रोजी पश्चिम बंगालमध्ये अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. मात्र पश्चिम बंगालमधील प्रचार कालावधी 20 तासांनी कमी करण्याचा निर्णय  निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे आज गुरूवारी, रात्रीच प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. यासह हिंसाचारासंबंधी कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यासही निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.

पश्चिम बंगालमधील संपूर्ण निवडणूक काळात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरंसींगद्वारे बैठक झाली. या बैठकीनंतर निवडणूक प्रचाराचा कालावधी २४ तासांनी कमी करून आज, गुरुवारी रात्री १० वाजता संपवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकात्यामधील ‘रोड शो’दरम्यान मंगळवारी झालेल्या हिंसाचारानंतर आयोगाने अखेरच्या टप्प्यात मतदान होणाऱ्या राज्यातील ९ मतदारसंघांतील प्रचार एक दिवस आधीच रोखला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा समाजाच्या आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

करण जोहर ठरला सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चित्रपट निर्माता

मुंबई – चित्रपट निर्माता करण जोहर बॉलिवूडच्या लोकप्रिय चित्रपट निर्मात्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाने गेल्या सहा महिन्यातील बॉलिवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट निर्मात्यांची नुकतीच एक...
Read More