निलंबित डीआयजी निशिकांत मोरेच्या अटकपूर्व जामिनावर उद्या फैसला – eNavakal
News मुंबई

निलंबित डीआयजी निशिकांत मोरेच्या अटकपूर्व जामिनावर उद्या फैसला

मुंबई – अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या डीआयजी निशिकांत मोरे यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी आज पूर्ण झाली. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी निर्णय राखून ठेवताना तो उद्या दिला जाईल असे स्पष्ट केले. गुन्हा दाखल झाल्यापासून गायब असलेल्या डीआयजी मोरे यांना सत्र न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही, त्यामुळे हायकोर्टानेही तूर्तास मोरेंना अटकेपासून कोणताही दिलासा दिलेला नाही. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर डीआयजी निशिकांत मोरे यांच्या वतीने उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्या अर्जावर आज सुनावणी झाली.
यावेळी विनयभंग झाल्याचा आरोप करण्यात आलेल्या संबंधित मोबाईल क्लीप्सचा सविस्तर पंचनामा राज्य सरकारने सादर केला. तर मोरे यांच्या वतीने दावा करताना त्यांच्याकडील मोबाईल क्लीपमध्ये पीडित मुलीचा कोणत्याही प्रकारे विनयभंग झाल्याचे स्पष्ट होत नाही असे स्पष्ट करताना त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. केवळ दोन कुटुंबीयांमध्ये आर्थिक व्यवहारावरून निर्माण झालेल्या वादावरून करण्यात आल्याचे पुरावे न्यायालयात सादर केले. तर तक्रारदाराने तक्रार उशिरा केल्याच्या आरोपाचे खंडण केले. उभय पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. तो उद्या बुधवारी देण्याची शक्यता आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मुंबई

मरकजला गेलेल्यांनी संपर्क केला नाहीतर कारवाई करू – मुंबई मनपा

मुंबई – राजधानी दिल्लीत तबलिगी मकरजला जे गेले होते, त्यांनी ताबडतोब मुंबई महापालिकेशी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि आपल्या प्रवासाची माहिती द्यावी, असे...
Read More
post-image
महाराष्ट्र

अंबरनाथमध्ये कोरोनाचा पहिला बळी

ठाणे – जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये सापडलेल्या पहिल्या रुग्णाचा आज मृत्यू झाला. त्याच्यावर मुंबईतील भाभा रुग्णालयात उपचार सुरु होते. अंबरनाथमधील बुवापाडा परिसरातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे...
Read More
post-image
देश

मुंबईतही ‘ऑनलाईन लग्न’ वऱ्हाडी मंडळीही उपस्थित

मुंबई – लॉकडाऊन असताना आता मुंबईतही एका तरुणाचा ऑनलाईन लग्न सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्यात दोन्ही बाजूची वऱ्हाडी मंडळी सहभागी झाली...
Read More
post-image
विदेश

इक्वाडोरच्या गल्लीत पडली 150 प्रेते, लोक त्यांच्याजवळ जायलाही घाबरतात

क्विटो – कोरोनाच्या महामारीने जगातील 200 देशांना विळखा घातला आहे. अमेरिकेपाठोपाठ लॅटिन अमेरिकेतील इक्वाडोर या लहानशा देशातही कोरोनाने थैमान घातले आहे. या देशातील गुयाक्विल...
Read More
post-image
विदेश

कोरोनाचा राग मोबाईल यंत्रणेवर

बर्मिंघम – करोनाच्या वाढत्या संसर्गाप्रमाणे काही देशांना सोशल मीडियातून फैलावणाऱ्या फेक न्यूजचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियातून करण्यात येणाऱ्या विविध दाव्यांमुळे प्रशासकीय यंत्रणांसमोर आव्हान...
Read More