‘निर्भय’ करणार अचुक मारा, परीक्षण यशस्वी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

‘निर्भय’ करणार अचुक मारा, परीक्षण यशस्वी

नवी दिल्ली – स्वदेशी तंत्रज्ञानाने निर्मित उप-सोनिक क्रूझ मिसाइल ‘निर्भय’ ची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. या क्षेपणास्त्राने संरक्षण क्षेत्रामध्ये भारताला बळकट केले आहे. ही मिसाईस कोणत्याही अडथळ्याशिवाय लक्ष्यावर अचूकपणे मारा करण्यास सक्षम आहे. मिसाईलचे यशस्वी परीक्षण करण्यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे(डीआरडीओ)  शास्त्रज्ञ यशस्वी झाले आहेत.


यापूर्वीही या मिसाईलचे अनेक यशस्वी परीक्षण करण्यात आले आहेत. लवकरच ही मिसाईल भारतीय सैन्यात समाविष्ट केली जाईल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या(डीआरडीओ) शास्त्रज्ञांनी सोमवारी सकाळी ओडिशाच्या समुद्र किनारपट्टीवर क्रूझ मिसाइलची चाचणी केली आहे.

ह्या मिसाइलची क्षमता यूएसच्या प्रसिद्ध टॉमहॉक मिसाईलच्या समतुल्य आहे. ‘निर्भय’ मिसाइल 300 किलो पर्यंत आण्विक वायु वाहून नेऊ शकते. या मिसाईलची अचूक लक्ष्य साधण्याची क्षमता खूप जास्त आहे. पाकिस्तान, चीनसह अनेक देश या क्षेपणास्त्राच्या कक्षेत येतात. ही मिसाईल काही सेकंदांत शत्रूच्या कोणत्याही प्रदेशाचे उच्चाटन करण्यास सक्षम आहे. या मिसाईलमुळे भारताची सैन्य शक्ती मजबूत होणार आहे.

‘निर्भय’ मिसाईलची पहिली चाचणी 12 मार्च 2013 रोजी  करण्यात आली. तर दुसरी चाचणी 17 ऑक्टोबर 2014 रोजी झाली. 16 ऑक्टोबर 2015 रोजी तिसरी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर 21 डिसेंबर 2016 रोजी पुन्हा चाचणी घेतली. याशिवाय नोव्हेंबर 2017 मध्ये यशस्वी चाचणी करण्यात आली. या सर्व चाचण्या ओडिशातील चांदीपूरमधील डीआरडीओच्या चाचणी क्षेत्रातून करण्यात आल्या आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाच्या वाढदिवसाचे ‘हे’ फोटो पाहिलेत?

माले – अभिषेक-ऐश्वर्या या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध जोडीच्या लग्नाला शनिवारी तब्बल १२ वर्ष पूर्ण झाली. आपल्या लग्नाचा १२ वा वाढदिवस या दोघांनी मालदीवमध्ये साजरा केला....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर,...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ ठार ३४ जखमी

मैनपुरी – उत्तर प्रदेशमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 दिल्लीचा पंजाबवर सहज विजय

नवी दिल्ली – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या दुसर्‍या लढतीत दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला १६३ धावांत रोखण्यात यश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक

मुंबई – मध्य, पश्‍चिम, हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान डाऊन जलद लाईनवर आज सकाळी 10.35...
Read More