निर्भयाचा मारेकरी अक्षयची फाशी कायम! पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली – eNavakal
News देश

निर्भयाचा मारेकरी अक्षयची फाशी कायम! पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली – निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी अक्षय कुमार ठाकुरने फाशीच्या शिक्षेविरोधात केलेली पुनर्विचार याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. न्या. भानुमती, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए.एस.बोपन्ना यांच्या खंडपीठाने हा युक्तिवाद आम्ही या आधीच ऐकून घेतला आहे, असे सांगत ही पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. कोर्टाच्या या निर्णयाने निर्भयाचा मारेकरी अक्षय ठाकुरची फाशीची शिक्षा कायम राहिली आहे. दरम्यान, निर्भयाच्या मारेकर्‍यांवर डेथ वॉरंट जारी करावे, अशी याचिका तिच्या पालकांनी पतियाळा कोर्टात दाखल केली होती. त्या याचिकेवर 7 जानेवारीला सुनावणी होणार आहे.
आज सकाळी साडेदहा वाजता सुप्रीम कोर्टात दोषी अक्षयने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी दोन्ही पक्षाच्या वकिलांनी आपली बाजू कोर्टात मांडली. अक्षयकुमार ठाकुरच्या वकिलांनी दिल्लीतील प्रदूषण आणि खराब हवेचा हवाला देतानाच,  फाशीची शिक्षा दिली जाऊ नये, त्या शिक्षेचा पुनर्विचार केला जावा, अशी विनंती कोर्टाला केली. त्याला सरकारकडून युक्तिवाद करणार्‍या महाधिवक्ता तुषार मेहता यांनी कडाडून विरोध केला. कोणत्याही परिस्थितीत या गुन्ह्यात माफी दिली जाऊ शकत नाही आणि दोषींना फाशीची शिक्षाच व्हायला हवी, असे मेहता यांनी सांगितले. या युक्तिवादानंतर तीन न्यायमुर्तींच्या खंडपीठाने फाशीची शिक्षा कायम ठेवत असल्याचा निकाल सुनावला. न्यायमुर्ती भानुमती यांनी त्यावर स्वाक्षरी केली.
दरम्यान, निर्भया प्रकरणी आणखी एक आरोपी विनयच्या दया याचिकेवर राष्ट्रपतींनी अद्याप निर्णय दिलेला नाही. दया याचिकेशिवाय फाशी होऊ शकत नाही. अक्षय ठाकुरही राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करु शकतो.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

पाणी चित्रपट हातातून गेल्यानेच सुशांत नैराश्येत, शेखर कपूर यांचा खुलासा

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. त्याच्या संपर्कात असलेल्या प्रत्येकाचा जबाब नोंदवला जात आहे. त्याचपार्श्वभूमीवर प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर...
Read More
post-image
देश

शेतकरी सन्मान योजनेचा पुढचा हप्ता १ ऑगस्टला, १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

नवी दिल्ली – पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मिळतात. या योजनेत आता १० कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंदणी झाली...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लोकांना सहभागी करून घ्या, मुख्यमंत्र्यांने आयुक्तांना आदेश

ठाणे – ठाण्यातील रुग्णसंख्या वाढत असून तिकडे व्यवस्थित उपाययोजना आखल्या गेल्या पाहिजेत अशा सूचना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका आयुक्तांना...
Read More
post-image
महाराष्ट्र

नोव्हेंबर अखेरपर्यंत कोरोना संपुष्टात येईल, सत्तेतील नेत्याचा दावा

नगर – कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता कोरोना केव्हा संपुष्टात येईल याबाबत अद्यापही कोणतेही संकेत नसताना ग्रामविकास मंत्री आणि नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नोव्हेंबरपर्यंत कोरोना...
Read More
post-image
महाराष्ट्र

‘शब्दच्छल करणाऱ्या सगळ्यांनाच शरद पवारांनी गारद केलंय’

पुणे -संजय राऊत यांनी शरद पवारांच्या मुलाखतीला दिलेले  ‘एक शरद, सगळे गारद’ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे, कारण शरद पवारांनी सगळ्यांनाच गारद केले आहे, असे...
Read More