नाशिकच्या जवानाची हत्या केल्याचा आरोप – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाशिकच्या जवानाची हत्या केल्याचा आरोप

नाशिक — डोक्यात गोळ्या झाडून येवला तालुक्यातील एका जवानाने आत्महत्या केली.ही धक्कादायक घटना आसाममधील तेजपूर बटालियनमध्ये घडली.या घटनेमुळे येवला तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून मानोरी देशमाने गावावर शोककळा पसरली आहे.ही आत्महत्या नसून घातपात आहे.घोटाळ्याची माहिती वरिष्ठांना दिल्यामुळे अडचणीत आलेल्या अधिकाऱ्यांनीच शेळके यांचा घातपात केल्याचा संशय जवानाच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेची केंद्रिय गृहखात्याकडून चौकशी सुरू होत नाही तो पर्यत पार्थिव न स्वीकारण्याचा इशारा मृतांच्या नातेवाईकांनी दिल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिंगबर माधव शेळके असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. दिगंबर शेळके गेल्या एकवीस वर्षांपासून लष्कराच्या सेवेत आहे. गेल्या काही वर्षांपासून शेळके आसाममधील तेजपूर बटालियनमध्ये कार्यालय होता. दोन महिन्यांपासून शेळके यांच्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्टोअर विभागाचा जबाबदारी जबरदस्तीने दिली होती. सदर विभागात २०१४ सालापासून मोठा घोटाळा सुरू असल्याने शेळके स्टोअरची जबाबदारी स्वीकारत नव्हते. या विभागातील घोटाळ्याची माहिती शेळके यांनी वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती.
आज पहाटे शेळके यांनी डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली.या घटनेची माहिती मिळताच शेळके कुंटूबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला.यामुळे शेळके यांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. स्टोअर विभागात झालेल्या घोटाळ्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यामुळे अडचणीत आलेल्या घोटाळ्यातील अधिकाऱ्यांकडूनच दिगंबरची हत्या झाल्याचा संशय पत्नीने व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची केद्रिय गृह खात्याकडून जोपर्यत चौकशीचे लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत पार्थिव ताब्यात न घेण्याचा इशारा शेळके कुंटूबियांनी दिला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
विदेश

जपानमध्ये आणीबाणी लागू होण्याचे संकेत

टोकियो – कोरोनाने जगातील तब्बल 190 देशाला विळखा घातला आहे. त्यातून आर्थिक ताकद असलेला जपानही दूर राहिलेला नाही. तेथे आतापर्यंत 3 हजार 654 जणांना...
Read More
post-image
महाराष्ट्र

जुन्नर तालुक्यातील शेतात गर्भवती महिलेची हत्या

जुन्नर – देशभरातील जनता कोरोनाच्या भीतीच्या छायेत वावरत असताना जुन्नर तालुक्यात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका २२ वर्षीय गर्भवती महिलेची हत्या करून...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यात सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा

मुंबई – राज्यात विशेषत: मुंबईत सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे. राज्यात अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तुंची कमतरता नसून मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे....
Read More
post-image
मुंबई

शेअर बाजारात तेजी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत असलेल्या मुंबई शेअर बाजारात आज सकाळपासूनच तेजीचे वातावरण आहे. त्यात बँकांच्या समभागात तेजी आल्यामुळे मुंबई शेअर...
Read More
post-image
महाराष्ट्र

मालेगावातील पावरलूम मालकांवर गुन्हे दाखल

नाशिक – राज्यातच नाही तर नाशिक जिल्ह्यातही सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना मालेगावात अनेक पावरलूम सुरूच होते. मात्र अखेर पाच पॉवरलूम मालकांवर गुन्हे दाखल...
Read More