नाशकात प्रसिद्ध रोईंगपटूवर चोरट्यांचा प्राणघातक हल्ला – eNavakal
News महाराष्ट्र

नाशकात प्रसिद्ध रोईंगपटूवर चोरट्यांचा प्राणघातक हल्ला

नाशिक – लुटमार करण्याच्या उद्देशाने चौघा जणांच्या टोळक्याने शहरातील प्रसिद्ध रोईंगपटूला रस्त्यात अडवत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.या हल्ल्यात रोइंगपटू जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास गंगापूररोड परिसरातील चोपडा लॉन्स जवळ घडली.या घटनेमुळे शहरातील क्रीडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी तिघा जंणाना ताब्यात घेतले आहे. निखिल सोनावणे असे रोइंगपटूचे नाव असून तो पंचवटी परिसरातील रहिवासी आहे.निखिल सोनावणे हा प्रसिद्ध रोइंगपटू असून तो गोल्ड मेडमिस्ट आहे.
मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास निखिल सोनावणे आपल्या मोटारसायकलवरून चोपडा लॉन्स जवळून घरी जात असतांना चौघा जंणाच्या टोळक्याने त्यांची मोटारसायकल रस्त्यात अडविले. त्याच्याकडे काहीच पैसे वा ऐवज न मिळाल्याने संतप्त लुटारूंनी निखिलला मारहाण करत त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात सोनावणे जखमी झाले असून त्यांच्यावर देवगावंकर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. 17 ते19 मे दरम्यान पुण्यात होणार्‍या स्पर्धेत सोनावणे यांनी भाग घेतला होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More