नालासोपाऱ्यात एटीएसची कारवाई; महाराष्ट्रात घातपाताचा कट उधळला – eNavakal
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

नालासोपाऱ्यात एटीएसची कारवाई; महाराष्ट्रात घातपाताचा कट उधळला

मुंबई – मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस)  नालासोपाऱ्यातील भांडारआळीत धाड टाकली आहे. भांडारआळी परिसरात सनातन संस्थेचा वैभव राऊत याच्या घरावर आणि दुकानावर एटीएसच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा छापा घातला. वैभव राऊत याच्या घरातून आठ देशी बॉम्ब हस्तगत केले आहेत. सरकारी वकीलांकडून न्यायालयात मोठा गौप्यस्फोट करण्यात आला असून आरोपींकडून ८ नाही तर 20 बॉम्ब जप्त करण्यात आल्याची माहिती वकीलांनी दिली आहे. तसेच ५० बॉम्ब बनू शकतील इतके साहित्यही जप्त करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

एटीएसने कारवाई केल्यानंतर वैभव राऊतसह, शरद कळस्कर आणि सुधन्वा गोंधळेकर या ३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तिघांना १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आगामी सणासुदीच्या दिवसात घातपाताचा त्यांचा कट असल्याची माहिती समोर आली आहे. गोंधळेकरला पुण्यातून तर कळस्करला नालासोपाऱ्यातून अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.  मुंबई, पुणे, सातारा, सोलापूरमध्ये घातपात करण्याचा त्यांचा कट होता. सुधन्वा गोंधळेकर हा शिवप्रतिष्ठानचा कार्यकर्ता तसेच वैभव राऊतचा सहकारी असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, बॉम्ब हस्तगत प्रकरणातील अटक केलेला वैभव राऊत सनातनचा साधक नाही, असा दावा सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केला आहे.

Mumbai: Anti-Terrorism Squad (ATS) conducted a raid at the residence of a person named Vaibhav Raut in Nala Sopara area yesterday and recovered some suspicious material from the house and a nearby shop. Vaibhav Raut detained. More details awaited. #Maharashtra pic.twitter.com/UwaI8WOTgb

— ANI (@ANI) August 9, 2018

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन

नवी दिल्ली – देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी यांचे गुरूवारी सायंकाळी ५ वाजता निधन झाले. वाजपेयी यांच्या पार्थिवावर राजघाटाजवळील राष्ट्रीय सृतीस्थळी लष्करी इतमामात आज शुक्रवारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

19 ऑगस्टला हरिद्वारमध्ये अटलजींचे अस्थिविसर्जन

नवी दिल्ली – देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी यांचे गुरूवारी सायंकाळी ५ वाजता निधन झाले. वाजपेयी यांच्या पार्थिवावर राजघाटाजवळील राष्ट्रीय सृतीस्थळी लष्करी इतमामात आज शुक्रवारी सायंकाळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

वसईतील नुकसानग्रस्त रहिवासी आजही शासन मदतीपासून वंचित

वसई –  वसई तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात जुलै महिन्यात मोठी अतिवृष्टी होऊन पावसाचे पाणी आणि सोबत पुराचे पाणी चक्क नागरिकांच्या घरात,दुकानात रस्त्यावर आदी ठिकाणी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

‘इसोव’नी रचला भारतासाठी नवा इतिहास 

नवी दिल्ली – स्वित्झर्लंड मध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद सायकल स्पर्धेत अंदमान निकोबारच्या अवघ्या १७ वर्षीय इसोव अल्बानने रौप्य पदक जिंकून भारतासाठी नवा इतिहास...
Read More
post-image
महाराष्ट्र

माळशेज घाटात पर्यटकांची झुंबड

मुरबाड – पर्यटकांच्या सुरक्षितेच्या हेतूने ठाणे जिल्ह्याचे तात्कालीन कार्यरत  जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळ माळशेज घाटातील सर्व  धबधबे व इतर पर्यटक स्थळांवर...
Read More