मुंबई – नालासोपारा शस्त्रसाठाप्रकरणी तपासयंत्रणेकडून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. श्याम मानव, मुक्ता दाभोलकर, जितेंद्र आव्हाड, रितू राज यांची नावे हिटलिस्टवर होती असे एटीएसने सांगितले आहे. आरोपी अविनाश पवार याच्या चौकशीत ही नावे उघड झाल्याचे तपासयंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. मुंबई सत्र न्यायालयात एटीएसने हा खुलासा केला.
घाटकोपर येथून अटक करण्यात आलेला आरोपी अविनाश पवार याच्या पोलीस कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्याची मागणी एटीएसने सत्र न्यायालयात केली आहे. या मागणीवर न्यायालयाने यापूर्वी तपासात काय चौकशी केली याची माहिती द्या असे म्हणत न्यायालयाने एटीएसला फटकारले.