नायरमधून चोरलेले बाळ ५ तासांत शोधले – eNavakal
मुंबई

नायरमधून चोरलेले बाळ ५ तासांत शोधले

मुंबई – नायर रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक सातमधून काल संध्याकाळी चोरीला गेलेलं बाळ शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. आग्रीपाडा पोलिसांनी अवघ्या ५ तासांत या बाळाचा शोध घेतला असून त्याला पळवणाऱ्या महिलेला सांताक्रूझमधील एका रुग्णालयातून ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, नायर रुग्णालयातील गर्भवती महिलांच्या सात नंबर वॉर्डमध्ये एक महिला आपल्या पाच दिवसांच्या बाळासह झोपली होती. काही वेळाने तिला जाग आली त्यावेळी बाळ शेजारी नव्हते. तिने आजूबाजूला चौकशी केली, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची बाळाचा शोध घेतला मात्र ते सापडले नाही. अखेर मुलाच्या आईसह रुग्णालय प्रशासनाने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर बाळ चोरीला गेल्याचे समोर आले. शिवाय महिलेची ओळखही पटली. त्यानंतर तातडीने कारवाई करून अवघ्या पाच तासांत हे बाळ सापडले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

चिदंबरम यांच्या भेटीला सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहारमध्ये

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज तिहार रुग्णालयात जाऊन ‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला

मुंबई – मोदी सरकारकडून शुक्रवारी कंपनी करात करण्यात आलेल्या कपातीनंतर आज शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने जवळपास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

अनुष्का शर्माचा देशातील सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत समावेश

नवी दिल्ली – मिसेस कोहली अर्थात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला भारतातील सामर्थ्यशाली स्री म्हणून घोषित करण्यात आले आहे. फॉर्च्यून इंडियाने भारतातील ५० सामर्थ्यवान...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – द्रूतगतीवरची कासवगती

केंद्रीय वाणिज्य आणि रेल्वे मंत्री यांना मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला आणि त्यांनी मुंबईकर कसे संयमी आहेत, असा पलटवार करून वेळ मारून नेली. परंतु...
Read More
post-image
मुंबई

घाटकोपरमध्ये कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या

मुंबई – घाटकोपर येथे कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान घाटकोपर येथे मयांक ट्युटोरियल...
Read More