नायडू-पवार भेट! बराच वेळ चर्चा – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

नायडू-पवार भेट! बराच वेळ चर्चा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात उद्या मतदान पार पडणार आहे. यादरम्यान नवं सरकार बनविण्याच्या दृष्टीने विरोधकांच्या हालचालींना वेग आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंदबाबू नायडू यांनी आज राजधानी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंच मात्र त्यानंतर चंद्राबाबूंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली असून जवळपास एक दीड तास त्यांच्यात चर्चा झाली.

दरम्यान, चंद्राबाबू नायडू लखनऊत सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांची भेट घेणार असल्याचे समजते आहे. तसेच टीडीपी पमुख राकांपा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाकपा महासचिव सुधाकर रेड्डी, लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव यांचीही चंद्रबाबू नायडू भेट घेणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. या वेगवान हालचालींमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अमित शहा २२ तारखेला मुंबईत; युतीवर शिक्कामोर्तब होणार?

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा २२ सप्टेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत.यावेळी गोरेगावच्या नेस्को मैदानात त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र हवामान

शाळा-महाविद्यालयांना सुट्टी पण अतिवृष्टी नाहीच

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार...
Read More
post-image
देश न्यायालय

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केेंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज दिल्लीतील न्यायालयाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

पवारांची मानसिकताच राजेशाही – मुख्यमंत्र्यांची टीका

नाशिक – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 5 वर्षांच्या कार्याचा थोडक्यात आढावा...
Read More