‘नायगारा’ धबधब्यावर प्रथमच ‘दिवाळी’चा जलौष – eNavakal
आघाडीच्या बातम्या विदेश

‘नायगारा’ धबधब्यावर प्रथमच ‘दिवाळी’चा जलौष

नवी दिल्ली – जगभरातील लाखो पर्यटकाचे एक प्रमुख आकर्षण असलेल्या ‘नायगारा’ धबधबा पहिल्यांदाच आतषबाजीने झगमगून उठणार आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्या सीमेवरील ‘नायगारा’ धबधबा येथे प्रथमच दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. येत्या १४ ऑक्टोबर रोजी इंडो-कॅनेडियन आर्ट काउन्सिल (आयसीएसी) आणि नियाग्रा पार्क कमिशनच्या संयुक्तविद्यमाने दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसह फटकांच्या रोषणाईत दिवाळी साजरी करण्यात येईल.

आयसीएसीचे प्रमुख अजय मोदी यांनी दिवाळी कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी मिळाल्याने आम्ही खूप आनंदात असल्याचे म्हटले. यंदा ७ नोव्हेंबरला दिवाळी आहे मात्र त्यावेळी येथे प्रचंड थंडी असते आणि त्यामुळे हवा खराब असू शकेल आणि सहभागी होणाऱ्यांना कार्यक्रमाचा आनंद पुरेसा लुटता येणार नाही. हे लक्षात घेऊन आम्ही १४ ऑक्टोबरला हा कार्यक्रम करणार आहोत. यात दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम होतील आणि सायंकाळी आतषबाजी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

अमित शाह आज मुंबईत! शिवसेना-भाजपा युती होणार?

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेत युती होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांना आता पुर्णविराम लागण्याची शक्यता...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ उभारणार- राज्यपाल

मुंबई- क्रीडा क्षेत्राचा विकास घडविण्यासाठी औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली. आज गेट वे ऑफ इंडिया...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागेवाडी गावाजवळ ट्रॅव्हल्स जळून खाक

जालना – जालना – औरंगाबाद रोडवरील नागेवाडी गावाजवळ पुण्याहून येणारी ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याची घटना आज पहाटे साडेपाच वाजता शॉर्ट सर्किटमुळे घडली. सुदैवाने या...
Read More
post-image
News विदेश

पाकिस्तानविरोधात आता अफगाणिस्तानही सरसावला

नवी दिल्ली- काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानातून रसद आल्याचे पुढे आल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरात संताप आहे. पाकिस्तानविरोधात असाच संताप दुसरे शेजारी इराण आणि अफगाणिस्तान...
Read More
post-image
News क्रीडा मुंबई

मंजिरी भावसार ठरली यंदाची ‘मिस मुंबई’

मुंबई – पीळदार सौंदर्यवतींच्या मिस मुंबई स्पर्धेत एफसीटी जिमची डॉ. मंजिरी भावसार विजेती ठरली. गतवर्षी अवघ्या दोन स्पर्धकांमुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. मात्र...
Read More