मुरबाड- ठाणे जिल्हापरिषद व पंचायतसमिती च्या निवडणुकाचे नामनिर्देश अर्ज दाखल करण्याची आज शेवटचा दिवस असल्याने ईच्छुक अपक्ष उमेदवारा सह ऱाजकीय पक्षाचे अनेक उमेदवार मुरबाड तहसील कार्यालयात आले होते मात्र या अर्ज दाखल करण्याची वेळ दुपारी 3 वाजे पर्यंतच असल्याचे घोषित करण्यात आले व ज्या उमेदवाराचे अर्जाची छाननी झाली असेच अर्ज स्विकारले जातील असे सांगितले त्यामुळे छाननी न झालेल्या उमेदवारा ना परत जायची वेळ आली पंरतु अचानक निवडणुक विभागाकडुन हि मुदत 5 वाजे पर्यत वाढवल्याने उर्वरित उमेदवारांची धावपळ झाली या बाबत निवडणुक विभागाशी संपर्क केला असता आम्हालाच उशिरा कळल्याचे सांगितले मात्र या घोळामुळे उमेदवारासह कर्मचारी वर्गाचीही धावपळ उडाली.
