नानाचौक सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाचे यंदाचे ७७ वे वर्ष – eNavakal
News महाराष्ट्र

नानाचौक सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाचे यंदाचे ७७ वे वर्ष

नानाचौक सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाचे यंदाचे ७७ वे वर्ष असून मंडळाने आज पर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम राबिवले आहेत. यावर्षी मंडळाने ‘नैतिक जबाबदारी’ या सामाजिक विषयावर देखावा सादर केला आहे. या देखाव्यात आपल्या नैतिक जबाबदाऱ्या काय आहेत आणि त्या कशा पूर्ण कराव्या हे सैनिक, पोलीस, शेतकरी आणि डॉक्टर्स यांचे उदाहरण देऊन समजावले आहे.

सैनिक बंधू दिवस रात्र देशाच्या सिमेवर लढत असून आपली जबाबदारी चोख बजावत असतात आणि आपल्यातील काही समाज त्यांच्यावर दगड फेक करतो त्यांचा योग्य असा सन्मान नाही करत. पोलीस बंधू सणा-सुधीलाही कर्तव्यदक्षतेची जबाबदारी पार पाडतात आणि आपल्यातील काही समाज कायदा आणि सुवव्यस्था मोडून राजकीय पाठबळ वापरून त्या कर्तव्यदक्ष पोलिसाला शिवीगाळ करतो, मारहाण करतो. शेतकरी बंधू जो अन्न-धान्य पिकवण्यासाठी स्वतः च्या जीवाचे ‘रान’ करतो. पण त्याच्या कष्टालाही आपण योग्य असा भाव नाही देत आणि त्याला मदत करायची सोडून त्याच्या परिस्थितीला तोच जबाबदार आहे असं दाखवतो, डॉक्टर्स बंधू स्वतःचे वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून आजारी व्यक्तींची सेवा करतो परंतु कधी कुठल्या कारणास्तव त्या आजारी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आपण त्या डॉक्टरला मारहाण करतो. अशा चुकीच्या वागणुकीत बदल करण्याचा एक संदेश देण्यात आला आहे. देखाव्याचे वैशिष्ठ म्हणजे देखाव्यात प्लास्टिक किंवा थर्माकॉलच्या पुतळ्याच्या वापरा ऐवजी मंडळातील शालेय वयाच्या मुलांचा वापर केला आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचे प्लास्टिक प्रदूषण होणार नाही याची मंडळाने काळजी घेतली आहे .

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम        

अखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप

मुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...
Read More