नादाल, जोकोव्हिच, ज्वेरवची आगेकूच – eNavakal
News क्रीडा विदेश

नादाल, जोकोव्हिच, ज्वेरवची आगेकूच

टोरॅन्टो – जागतिक टेनिस क्रमवारीत पुरुष गटात अव्वल क्रमांकावर असलेल्या राफेल नादाल, नोवाक जोकोव्हिच आणि अ‍ॅलेक्झांडर ज्वेरवने येथे सुरू असलेल्या टोरॅन्टो आंतरराष्ट्रीय मास्टर्स टेनिस स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखताना तिसर्‍या फेरीत प्रवेश केला. दुसर्‍या फेरीच्या सामन्यात नादालने फ्रान्सच्या बेनोइट पेयरचा सरळ दोन सेटमध्ये 6-2, 6-3 असा आरामात पराभव केला.
नादालने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करून पेयरेला विजयाची संधी दिली नाही. त्याने दोन्ही सेटमध्ये सुरुवातीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. 3 वेळा ही स्पर्धा जिंकणार्‍या नादालचे लक्ष यंदा चौथ्या जेतेपदाकडे आहे. नादालने ही लढत तासाभरात जिंकली. आता तिसर्‍या फेरीत त्याचा मुकाबला वॉवरिंकाशी होणार आहे. दुसर्‍या सामन्यात वॉवरिंकाने 3 सेटमध्ये चुरशीच्या लढतीत मार्टन फुकसोविचा पराभव केला. पहिला सेट गमावून देखील पुढचे 2 सेट जिंकून वॉवरिंकाने सामन्यात जोरदार कमबॅक केले. गेल्याच महिन्यात झालेली विम्लब्डन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकणार्‍या नोवाक जोकोव्हिचने दुसर्‍या फेरीच्या लढतीत कॅनडाच्या पीटर पोलंस्कीलादेखील दोन सेटमध्ये नमवले. आक्रमक खेळ करून जोकोने पीटरला विजयाची संधी दिली नाही. गतविजेत्या आणि स्पर्धेत दुसरे मानांकन देण्यात आलेल्या जर्मनीच्या अ‍ॅलेक्झांडर ज्वेरवनेदेखील आपल्या दुसर्‍या फेरीची लढत सहज जिंकली. त्याने बॅडलेला 6-4, 6-4 असे दोन सेटमध्ये नमवले.इतर सामन्यात जॉन इस्नेर फॅबिफोगेनी,डेनिस शापालोव यांनीदेखील विजय मिळवला. अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू डेल पोत्रौने मात्र हाताला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून शेवटच्या क्षणी माघार घेतली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मराठीत बोलायला सांगितल्याने कुरियर बॉयचा तरुणींवर हल्ला

मुंबई – आज सकाळी 11.30 वाजता दादरच्या न.चिं. केळकर रोडवरील गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या पेडणेकर भगिनींच्या घरी कुरियरवाला आला. या भगिनींनी कुरियरद्वारे स्वामी समर्थांची पुस्तके मागविली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्य प्रदेशात पबजीवर बंदी आणण्याचा विचार

भोपाळ – अलिकडे स्मार्ट मोबाईल फोनवर पबजी खेळ खेळण्याचा जीवघेणा छंद वाढीस लागला आहे. हा खेळ खेळता खेळता अनेकांना त्याचे व्यसन लागत आहे. त्यामुळे तरुणाईला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

‘क्रोकोडाइल हंटर’ स्टीव्ह यांना गुगलची आदरांजली

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांची आज 57 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे. स्टीव्ह इरविन यांना ‘क्रोकोडाइल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना उत्तर प्रदेशात अटक

सहारनपूर – सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथून जैश ए मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. या संशयितांकडून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

प्रियांका-फरहानच्या ‘स्काय इज पिंक’ची तारीख ठरली

मुंबई – अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता फरहान अख्तर यांचा आगामी चित्रपट ‘स्काय इज पिंक’ कधी प्रदर्शित होणार याविषयी चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. पण आता...
Read More