नाताळ, नववर्षांच्या पार्ट्यांवर अबकारीचा ‘तिसरा डोळा’ – eNavakal
मुंबई

नाताळ, नववर्षांच्या पार्ट्यांवर अबकारीचा ‘तिसरा डोळा’

वसई – नाताळचा सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असतांना, शेजारील राज्यातून मोठया प्रमाणावर बेकायदा मद्य शहरात विक्रीसाठी आणले जात आहे. तसेच नाताळ, नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर छुप्या पद्धतीने ओल्या – मद्यपाटर्या होणार आहेत आणि त्या रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने यंदा ही एक विशेष मोहीम सुरू केली असून त्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांनी आता विविध ठिकाणी छापे टाकण्यास सुरूवात केल्याचे समजते. विशेष म्हणजे शहरातील आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विविध ठिकाणी यांचे तपासणी नाके उभारण्यात आले असून संशयीत अशा सर्वत्र जागोजागी छापेमारी सुरू करण्यात आली आहे.

वसईत हॉटेल्स, धाबे तसेच रिसॉर्ट्स भरपूर असल्याने डिसेंबर महिन्यात नाताळ सण व नववर्षांचे स्वागत मोठ्या आनंदात केले जाते आणि त्याला जोड म्हणून शेजारील राज्यातून स्वतः म्हणून दमण बनावटीचे मद्य मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या वसई -विरार शहरात आणले जात असते. त्यावर राज्य उत्पादक शुल्क विभागाकडून कारवाई केली जाते. अगदी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच हा साठा चोरट्या मार्गाने वाहतूक करून आणला जातो, तो रोखण्यासाठी राज्य उत्पादक शुल्क विभागाने ही विशेष मोहीम उघडली आहे.

१५ दिवसात ५२ लाखांचे मद्य जप्त

१ डिसेंबरपासून केलेल्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने तब्ब्ल ५२ लाखांचे मद्य जप्त केले असून आतापर्यंत १३ वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पालघर जिल्ह्याचे अधिक्षक डॉ विजय भुकन यांनी दिली.

मद्य स्वतः म्हणून परराज्यातून होतेय चोरटी वाहतूक

मद्यविक्रीवर शासनाकडून उत्पादन शुल्क आकारले जाते. राज्यात मद्यवरील उत्पादन शुल्क ५० टक्के असून ते इतर राज्यांपेक्षा अधिक आहे. दीव-दमण, दादरा नगरहवेली आदी केंद्रशासित प्रदेशात मद्यावरील उत्पादन शुल्क १२ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे तिथे मद्य स्वस्त दरात मिळते. याचा फायदा घेत या प्रदेशातून चोरट्या मार्गाने मद्य पालघर जिल्ह्यात आणि तेथून पुढे मुंबईत नेले जाते. यामुळे राज्य शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असतो. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होत असल्याने हे टाळण्यासाठी ही कारवाई केली जात आहे.

ऑनलाईन पाटर्यांचे आयोजन करणारे हिटलिस्टवर

डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाटर्यांचे आयोजन होते, त्यात चोरटे मद्य तसेच अमली पदार्थाचा वापरही केला जातो. या छुप्या पाटर्या शोधून त्यावर कारवाई करणे एक मोठे आव्हान या पथकावर असते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अशा पाटर्यांचा शोध घ्यायला आता कंबर कसली आहे. तर या पाटर्याच्या जाहिराती ऑनलाइन संकेतस्थळावर देखील झळकत असून सुट्टीच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर अशा पाटर्या होत असतात त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा या भरारी पथकाचा वॉच राहणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद – केंद्राची सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्क्रमातून ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली होती. महात्मा गांधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More