नाणेघाटातून साहित्य दिंडी काढून मराठी राजभाषा दिन साजरा – eNavakal
उपक्रम महाराष्ट्र

नाणेघाटातून साहित्य दिंडी काढून मराठी राजभाषा दिन साजरा

नारायणगाव – शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाळकवाडी ( ता जुन्नर) यांच्या वतीने मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला यानिमित्त नाणेघाट ते चाळकवाडी साहित्य दिंडी  बालकवी संम्मेलन शिक्षकांचे कवीसंम्मेलन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते चाळकवाडी येथे गेल्या चोविस वर्षांपासून मराठी राजभाषा दिनानिमित्त शिवांजली साहित्य मोहत्सवाचे आयोजन करण्यात येत असते या निमित्त सोमवारी दुपारी तीन वाजता नाणेघाट या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक मराठी भाषा शिलालेखाचे पूजन ,प्रसिद्ध गझलकार देविदास इंदापवार  यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी इतिहास अभ्यासक विनायक खोत यांनी नाणेघाटातील दोन हजार वर्षांपूर्वीच्या मराठी भाषेच्या शिलालेखाबद्दल माहिती दिली तर पुण्याच्या कवयत्री संगीता झिंजुरके, एकनाथ महाराज रावळ व सुनिल जगताप यांनी मराठी भाषेवरील कविता सादर केल्या तर शिवांजली साहित्यपीठाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी चाळक यांनी शिवांजली साहित्य मोहत्सवाबाबत माहिती दिली नागपूरचे प्रसिद्ध कवी राजेश कुबडे ,सुजित कदम, रमेश खरमाळे ,गणेश मोढवे ,पल्लवी बनसोडे ,सविता इंगळे, व्रुषाली शिंदे ,गिता देव्हारे ,बाबासाहेब जाधव ,कैलास शिंदे ,जयवंत सोनवणे , प्रा.जयसिंग गाडेकर, विलास हाडवळे, संदीप वाघोले, शुभम वाळूंज, एफ बी आतार ,वैशाली सावंत आदी मान्यवर उपस्थित होते त्यानंतर या ग्रंथ दिडी जुन्नर शहरात आल्यानंतर राष्ट्रवादी काॅग्रेसचे राज्य उपाध्यक्ष अतुल बेनके  उज्वला शेवाळे नगरसेवक अविन फुलपगार यांनी या ग्रंथदिंडीचे स्वागत केले

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम        

अखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप

मुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...
Read More