‘नाणार’ विरोधी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘नाणार’ विरोधी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई – मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. ‘आरे’ वाचवण्यासाठी आंदोलन करणार्‍या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर आज त्यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनामधील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले एकूण 23 गुन्हे मागे घेण्याचा आदेश दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे नाणार विरोधी आंदोलनातील आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नाणार हे गाव रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर राजापूर तालुक्यात आहे. 2015 साली सरकारने येथे तेलशुद्धीकरण प्रकल्पाची घोषणा केली होती. मात्र स्थानिकांनी आणि राजकीय पक्षांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध करत आंदोलने केली. यावेळी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आंदोलकांवरील हे गुन्हे मागे घेणार असल्याचे आश्‍वासन तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्च 2018 मध्ये संघर्ष समितीला दिले होते. मात्र त्यानंतरही फडणवीसांनी हे गुन्हे मागे घेतले नव्हते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

तुकाराम मुंढेविरोधात न्यायालयात जाण्याचा भाजपाचा इशारा

नागपूर – नागपूर महापालिकेचे शिस्तप्रिय आयुक्त तुकाराम मुंढे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण स्मार्ट सिटी अनियमितता प्रकरणात महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे गोत्यात येणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा! ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई – काही दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस मुंबईत काही ठिकाणी पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर या...
Read More
post-image
देश

७०५ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी जीव्हीकेचे अध्यक्ष व पुत्रावर गुन्हा

मुंबई – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासात ७०५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी जीव्हीके ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष जी. वेंकट कृष्णा रेड्डी आणि त्यांचा मुलगा जीव्ही...
Read More
post-image
विदेश

बोत्सवाना देशात ३५० हत्तींचा रहस्यमय मृत्यू

गॅबोरोने – आफ्रिकेमधील बोत्सवाना देशात मागील काही दिवसांमध्ये ३५० हत्तींचे मृतदेह सापडले आहेत. जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या या हत्तींच्या मृतदेहांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

सुशांतच्या सर्व लकी नंबरच्या गाड्यांचा लवकरच लिलाव?

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर आता त्याच्या गाड्यांचा लिलाव होण्याची शक्यता आहे. सुशांतच्या गाड्या विकत घेण्यासाठी काही जण प्रयत्नशील आहेत. सुशांतने...
Read More