नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन घेतले मागे;मात्र शिवसेनेचे मौन – eNavakal
आंदोलन महाराष्ट्र मुंबई

नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन घेतले मागे;मात्र शिवसेनेचे मौन

मुंबई- राजापूर तालुक्यात विनाशकारी रिफायनरी प्रकल्प लादण्याचा सरकारचा डाव हाणून पाडण्याचा  निर्धार करून कोकण रिफाईनरी विरोधी संघर्ष संघटनेने हजारो कोकणवासीयांच्या साथीने आझाद मैदानावर आज आंदोलन केले. स्थानिक नागरिकांचा विरोध डावलूनही रिफायनरीसाठी सरकारच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. या रिफायनरी प्रकल्पाविरोधात मुंबईत झालेल्या या आंदोलनात स्थानिकांनी या प्रकल्पाविरोधात आपल्या भावना तीव्रपणे मांडल्या.मात्र मुख्यमंत्री स्थानिकांच्या विरोधानंतरदेखील आडमुठी भूमिका घेत प्रकल्प रद्द करत नसल्याचे चित्र होते.नारायण राणेंच्या मध्यस्तीने आंदोलन मिटले खरे मात्र आता हे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा अशोक वालं यांनी दिला आहे.
सकाळी आंदोलन सुरु झाल्यापासून ‘एकाच जिद्द रिफायनरी रद्द’ , ‘ जमीन आमच्या हक्काची,नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणांनी आझाद मैदान परिसर दणाणून गेला. नारायण राणे आणि त्यांचे पुत्र माजी खा. निलेश राणे यांनी आंदोलकांची भेट घेऊन हा प्रकल्प १०० टक्के रद्द करायलाच लावू ते आश्वासन दिले. त्यानंतर कोकण रिफाईनरी विरोधी संघर्ष संघटनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीस गेले. मात्र तिथे समाधानकारक चर्चा न झाल्याने आम्ही आमरण उपोषणास बसत असल्याची भूमिका संघर्ष समितीच्या सदस्यांनी घेतली. त्यावर नारायण राणे यांनी मध्यस्ती करत समिती सदस्यांचे मन वळवले.
मात्र शिवसेनेचे नेते या आंदोलकर्त्यांकडे फिरकलेदेखील नाहीत. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसाची तयारी करण्यास राजन साळवींसह सगळेच शिवसेनेचे नेते व्यस्त आहेत असे दिसते. त्याचबरोबर विधानसभेतदेखील यामुद्द्यावर प्रश्न काँग्रेसच्या खासदार हुस्नबानो खलिफे यांनीच उपस्थित केला होता. त्यामुळे शिवसेनेने नाणार प्रकल्पाबाबत कोकणी जनतेची घोर फसवणूक केली असल्याचा संतापजनक सूर जनतेत उमटत आहे.
याआधी काँग्रेसच्या आमदार हुस्नबानो खलिफे आणि राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी आमदारहुस्नबानो खलिफे यांनी कोकणवासीयांना निसर्गाचा ऱ्हास करणारा आणि प्रदूषण पसरवणाऱ्या प्रकल्पाची गरज नसल्याचे सांगितले. तसेच याबाबत नेहमीच विधानसभेत आवाज उठवत राहू असे आश्वासन दिले. तर विद्या चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींना हा प्रकल्प गुजरातला न्या अन्यथा कोकणी जनता तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला. मोदी सरकार चांगले चांगले प्रकल्प गुजरातला नेते आणि असे प्रदूषण करत पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारते असा आरोप केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-०३-२०१९)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (०१-०६-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०७-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण : सर्व आरोपींची मुक्तता

नवी दिल्ली – 12 वर्षांपूर्वी झालेल्या समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटप्रकरणी मुख्य आरोपी असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची मुक्तता करण्याचा निर्णय पंचकुलामधील विशेष एनआयएच्या न्यायालयाने दिला आहे. या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

टीव्हीवर ‘हे’ भाषण ऐकण्यासाठी पवारांनी बैठक थांबवली

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान टीव्हीवर एक भाषण लागलं आणि पवारांनी चक्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

शमीला वर्ल्ड कपसाठी पुरेशी विश्रांती मिळणार

मुंबई – इंडियन प्रीमिअर लीगमध्ये भारतीय संघातील खेळाडूंवर पडणाऱ्या अतिरिक्त तणावावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आगामी वर्ल्ड कपचं महत्त्व लक्षात घेता किंग्स इलेव्हन पंजाब...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

आता इंस्टग्रामवरून शॉपिंग करता येणार

नवी दिल्ली – इंस्टग्राम या सध्याच्या लोकप्रिय अॅपने निवडक ब्रँडच्या उत्पादनाची खरेदी करण्याची सुविधा आणली आहे. इन्स्टाग्राम अॅपमध्ये नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या...
Read More