नाणार रिफायनरीवरून भाजपाविरोधी वातावरण पेटले, मनसे कार्यकर्त्यांनी केली तोडफोड, उद्धवजींची 23 ला जाहीर सभा – eNavakal
News मुंबई

नाणार रिफायनरीवरून भाजपाविरोधी वातावरण पेटले, मनसे कार्यकर्त्यांनी केली तोडफोड, उद्धवजींची 23 ला जाहीर सभा

मुंबई – रत्नागिरीतील नाणार रिफायनरी प्रकल्पावरून राज्यात भाजापाविरोधी वातावरण पेटत चालले आहे. स्थानिकांचा विरोध डावलून हा प्रकल्प राज्य सरकार जबरदस्तीने लादू पाहत आहे. काल राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्प कोकणात होऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता. या इशार्‍यानंतर आज मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी ताडदेव येथील नाणार रिफायनरी प्रकल्प कार्यालयात घुसून ‘मनसे स्टाईलने’ तोडफोड केली. त्यामुळे हा वाद अधिकच चिघळला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही याच मुद्यावरून येत्या 23 एप्रिलला नाणार येथे जाहीर सभा घेणार आहेत.

राजापूर येथे होऊ घातलेल्या नाणार ऑईल रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. या प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी सरकारविरोधात आंदोलनेही केली. ग्रामस्थांच्या या लढ्याला शिवसेनेने पाठिंबा दिला असून मनसेही ग्रामस्थांच्या पाठीशी उभी राहिली आहे. ल्लिीत या प्रकल्पाचा करार झाल्यानंतर संतप्त प्रकल्पग्रस्तांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल मुलुंड येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी कोकणातील नाणारचा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होणार नाही, असा खरमरीत इशारा राज्य सरकारला दिला होता. राज ठाकरे यांच्या इशार्‍यानंतर आज मनसेचे 5 ते 6 कार्यकर्ते ताडदेव येथील रिफायनरी अँड पेट्रो-केमिकल लिमिटेडच्या कार्यालयात घुसले.ताडदेव येथील एसी मार्केट परिसराश्रत हे कार्यालय आहे. रत्नागिरीच्या नाणार प्रकल्पाचे हे कार्यालय आहे की नाही, याची खातरजमा तेथील स्टाफकडे केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आपल्या स्टाईलने या कार्यालयाची तोडफोड केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी गळ्यात झेंडे घालून रिफानरीच्या कार्यालयातील काचांची दगड, खुर्च्यांनी तोडफोड केली. या प्रकरणी अद्याप कोणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

उद्धव ठाकरे ग्रामस्थांशी चर्चा करणार

आज उद्धव ठाकरे यांच्या होऊ घातलेल्या दौर्‍याची रूपरेषा ठरावण्याबाबत शिवसेना पदाधिकार्‍यांची ’मातोश्री’वर बैठक पार पडली. त्यानंतर खा. विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौर्‍याची माहीती देताना सांगितले की, येत्या 23 एप्रिलला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाणारमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. त्याआधी प्रस्तावित रिफायनरीच्या विरोधाबाबत कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष समिती, स्थानिक संघर्ष समिती व पंचक्रोशीतील इतर ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत. जे जे त्यावेळी उपस्थित असतील त्यांच्याशी प्रकल्पाबाबत चर्चा केली जाईल. त्यानंतर उद्धव ठाकरे दुपारी सागव्यातील कात्रादेवी मंदिराजवळ जाहीर सभा घेतील, असे राऊत यांनी सांगितले. येत्या 19, 20 एप्रिलला खा. हुसेन दलवाई यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसचे शिष्टमंडळ नाणारला भेट देणार असुन तेथील स्थानिक ग्रामस्थांशी संवादही साधणार आहे. त्याचप्रमाणे 10 मेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही नाणार व परिसराचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर 23 एप्रिलचा उद्धव ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय म्हणून ’नाणार’ प्रकरण पुढे येत असताना या भागात बर्‍यापैकी राजकीय ताकद असलेला पक्ष म्हणुन शिवसेनेच्या भूमिकेला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही नाणार येथील रिफायनरीला प्रखर विरोध केल्याने उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
Uncategoriz

अजयने शेअर केला पत्नी काजोलचा मोबाईल नंबर

मुंबई – आपल्या आवडत्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा पर्सनल मोबाईल नंबर मिळावा आणि त्यांच्याशी एकदा तरी फोनवर प्रत्यक्षात बोलता याव अशी इच्छा प्रत्येक चाहत्याची असते....
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – गणेशमंडळांनाच समुपदेशनाची गरज

गणेशविसर्जनाच्या काळात सर्व प्रकारची काळजी घेऊनही अनेकांचे बळी जाण्याचा प्रकार धक्कादायक ठरतो. याबद्दलचा निश्चित आकडा उपलब्ध झाला नसला तरी दोन लहान मुले आणि नाशिकच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

राज्यभरात विसर्जनादरम्यान 20 जणांचा बुडून मृत्यू

मुंबई –  ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी करीत मुंबईसह राज्यभरातील गणपती बाप्पाला निरोप...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उत्तर भारतात पावसाचे थैमान, ८ जणांचा मृत्यू

चंडीगड – केरळमध्ये पावसाने हैदोस घातल्यानंतर आता उत्तर भारतात पावसाने हाहाकार माजवला आहे. हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे ८ जणांना जीवाला मुकावे लागले आहेत. तर, पंजाब, हरयाणा...
Read More