नागपूर – रत्नागिरीतील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील लढा अधिक उग्र होत असून आज नाणारवासीयांनी नागपूर विधानभवनावर मोर्चा काढला. या मोर्चाला शिवसेनेने पाठिबा दिला असून नाणार रीफायनरी प्रकल्पविरोधकांच्या मोर्चामध्ये शिवसेनेचे मंत्री रविंद्र वायकर, डॉ. नीलम गोऱ्हे, राजन साळवी आदी आमदारांनी हजेरी लावली आहे. यामुळे पुन्हा एकदा शिवसेना – भाजप आमनेसामने आले आहेत. दरम्यान नाणार संघर्ष पेटणार असल्याच स्पष्ट झालं आहे.
