नाणार जमिन अधिग्रहण रद्द करा, शिवसेना मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यंना पत्र – eNavakal
News मुंबई

नाणार जमिन अधिग्रहण रद्द करा, शिवसेना मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यंना पत्र

मुंबई – नाणार प्रकल्पाच्या जमिनीचे अधिग्रहण रद्द करा अशा मागणीचे पत्र आज शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दिले. भाजपाचा महत्वकांक्षी असलेल्या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री शिवसेना नेत्यांच्या पत्राला काय ‘रिप्लाय’ देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
रत्नागिरीतील तळकोकणात नाणारचा प्रकल्प उभारण्याचा सरकारने घाट घातला आहे. या प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी अनेकदा आंदोलने केली. मात्र स्थानिकांचा विरोध डावलूनही सरकारने हा प्रकल्प होणार असल्याची भुमिका घेतली आहे. स्थानिकांच्या या विरोधाला राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. दोन महिन्यांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाणारचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी नाणार प्रकल्प गेला, तो होऊ देणार नसल्याचे सांगितले होते. तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणारची अधिसुचना रद्द केल्याची घोषणा केली होती. मात्र यावरून राजकारण तापले होते. अधिसुचना रद्द करण्याचा अधिकार फक्त उच्चाधिकार समितीला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यानंतर नाणार प्रकल्पाचा सौदी अरेबियन कंपनी असलेल्या अमरेकोशी करार करण्यात आला होता. आज या प्रकल्पाच्या जमिनीचे अधिग्रहण रद्द करावे, असा मागणीचे पत्रच शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दिले. शिवसेना नेत्यांच्या या पत्रावर मुख्यमंत्री काय ‘रिप्लाय’ देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

सोन्यानंतर आता ‘हिरेजडित कोरोना मास्क’ची क्रेझ

कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क वापरणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्वजण सध्या मास्क घालूनच पाहायला मिळतात. मात्र ऐकावं ते नवल म्हणतात ना,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राजस्थानच्या प्रदेशाध्यक्षपदी गोविंदसिंग यांची नियुक्ती

नवी दिल्ली – राजस्थान सरकारमधून बंडखोरी करत दिल्लीत आलेल्या सचिन पायलट यांची अखेर काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी राजस्थानच्या काँग्रेस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया…

नवी दिल्ली – राजस्थान सरकारमधून बंडखोरी करत दिल्लीत आलेल्या सचिन पायलट यांची अखेर काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरून हटवले

नवी दिल्ली – राजस्थान सरकारमध्ये बंडाचा झेंडा फडकवणारे सचिन पायलट यांची अखेर काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर...
Read More
post-image
देश शिक्षण

सीबीएसई दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

मुंबई – कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशात जवळपास मागील चार महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन काळात सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. अशात बोर्डाचे निकाल कधी...
Read More