नाणार भूसंपादनासाठी केंद्रिय समिती सुकथनकर आणि इंडियन ऑईलचे नेतृत्त्व – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

नाणार भूसंपादनासाठी केंद्रिय समिती सुकथनकर आणि इंडियन ऑईलचे नेतृत्त्व

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील कोकणचा प्रस्तावित नाणार प्रकल्प काहीही करून पुढे रेटण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. स्थानिकांचा कडवा विरोध असूनही केंद्र सरकारने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भूसंपादन करण्याकरिता केंद्रिय समिती नेमली आहे. भूसंपादनाचा संपूर्ण आराखडा ही समिती तयार करणार असून महाराष्ट्राचे माजी सचिव द. म. सुकथनकर समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त झाले आहे. या समितीच्या स्थापनेसाठी इंडियन ऑईल कंपनीने पुढाकार घेतला आहे. याबाबत शिवसेेनेने नेहमीप्रमाणे मौन पाळले आहे. नारायण राणेही गप्प आहेत.

भूसंपादन आणि प्रकल्पग्रस्तांचे समाधानकारक पुनर्वसन याबाबत येत्या सहा महिन्यांत समिती अहवाल देणार आहे. अहवालातील सूचनांची माहिती महाराष्ट्र सरकारला देण्यात येईल. नाणार प्रकल्पासाठी इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदूस्थान पेट्रोलियम, अबू धाबी नॅशनल ऑईल कंपनी आणि सौदी अरेबियाची अरामको कंपनी यांच्यात दोन करार झाले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही...
Read More